कर्डिले नावाची नेत्यांना पोटदुखी

पीक कर्जाचा श्रेयवाद : १०० कोटींच्या तोटा करणारे कळसूत्री
शिवाजी कर्डिले
शिवाजी कर्डिले

अहमदनगर (प्रतिनिधी)

जिल्हा बँकेच्या (Ahmednagar District Bank) पीक कर्ज (Crop Loan) मर्यादा वाढीचा श्रेयवाद चांगलाच पेटला आहे. माझ्या नावामुळे काहींना दडपण आले. पोट दुखणाऱ्या नेत्यांनी या निर्णयाबाबत स्पष्टीकरण देण्यास जिल्हा बँक अध्यक्षांना भाग पाडले. असा आरोप बँकेचे संचालक माजी आमदार शिवाजी कर्डिले (Shivaji Kardile) यांनी केला आहे. दरम्यान, बँक आणि साखर कारखान्याला शंभर कोटींचा तोटा करणारेच या श्रेयवादाचे पडद्याआडील कळसूत्री असल्याचा त्यांचा रोख होता.

शिवाजी कर्डिले
अजबच! नगर जिल्ह्यातील असे एक गाव जिथे केली जाते दैत्याची पूजा.., गावात मारूतीचं मंदिर नाही

जिल्हा बँकेच्या पीक कर्ज मर्यादावाढीचा निर्णय जाहीर करण्यावरून श्रेयवाद रंगला आहे. हा निर्णय कर्डिले यांनी परस्पर जाहीर केल्यानंतर जिल्हा बँक अध्यक्ष उदय शेळके यांनी हा निर्णय बँकेच्या संचालक मंडळाचा असल्याचे स्पष्टीकरण देत त्यांच्यावर टीका केली. यामुळे बँक वर्तुळ आणि सभासदांमध्ये खमंग चर्चा सुरू झाली आहे. बँक सत्ताधारी मंडळ चालविते की शिवाजी कर्डिले अशी कुजबुज सुरू आहे. कर्डिले बँकेच्या निर्णयात एवढी दखल देत असतील तर जिल्हा बँकेचे अध्यक्ष काय करतात, हा प्रश्नही चर्चेत आहे.

शिवाजी कर्डिले
Prarthana Behere : पांढऱ्या नक्षीदार साडीतला 'प्रार्थना'चा मोहक लूक, पहा फोटो

अध्यक्षांच्या स्पष्टीकरणावर कर्डिले यांनी निशाणा साधला आहे. कर्ज मर्यादा वाढविल्याबद्दल त्यांचा केडगाव येथे सत्कार झाला. या कार्यक्रमात त्यांनी या घडामोडींवर भाष्य केले. ते म्हणाले, जिल्हा बँकेच्या मंडळासमोर विषय आल्यावर संचालक त्यावर भूमिका मांडतात. तेच मी केले. यावेळी पीक कर्ज मर्यादा २० ऐवजी ३० हजार करावी, ही मागणी सर्व संचालकांनी मान्य 9 केली. बँकेतील निर्णय अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळ सर्वानुमतेच घेत असतात, यात दुमत नाही. पण हा निर्णय मी जनतेला सांगितला म्हणून काहींचे पोट दुखले. या दुखावलेल्या मंडळींना शांत करण्यासाठीच अध्यक्ष शेळकेंना स्पष्टीकरणाचा खटाटोप करावा लागला असावा, असा टोलाही त्यांनी लगावला.

शिवाजी कर्डिले
Amruta Khanvilkar : 'अप्सरा हो तुम, या कोई परी'! अमृताचं निळ्या साडीतील भुरळ घालणारं सौंदर्य

जड कोणास गेले?

कर्ज मर्यादा वाढीचा निर्णय माझ्या नावे जाहीर होणे काहींना जड जात आहे. ज्यांनी बँकेचा आणि सहकारी साखर कारखान्याचा शंभर कोटी रुपयांचा तोटा केला, त्यांचे यामुळे पोट दुखत आहे. त्यांनीच बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांवर देण्यासाठी दबाव आणला, असा आरोप शिवाजी कर्डिले यांनी केला. दबाव आणणारे नेते कोण, हे त्यांनी स्पष्ट केले नाही. त्यामुळे या नावांबाबत विविध अंदाज लावले जात आहेत.

शिवाजी कर्डिले
बॉक्स ऑफिसवर RRR चा दबदबा; The Kashmir Files ला जोरदार टक्कर

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com