24 तासांत करोनाचे 132 नवे रुग्ण
सार्वमत

24 तासांत करोनाचे 132 नवे रुग्ण

मृत्यूच्या संख्येत पाचची वाढ : 126 रुग्णांची करोनावर मात

Arvind Arkhade

अहमदनगर| Ahmednagar

जिल्ह्यातील करोनाचा संसर्ग सुसाट असल्याचे दिसत आहे. गेल्या 24 तासांत जिल्ह्यात करोनाचे नव्याने 132 रुग्ण नोंदवले गेले आहेत. यासह मृतांच्या आकड्यात जिल्हा आरोग्य यंत्रणेने अचानक पाचने वाढ केली आहे. यामुळे जिल्ह्यातील करोना बळीची संख्या 38 झाली आहे. यासह जिल्ह्यातील एकूण करोना बाधितांची संख्या आता 1 हजार 571 वर पोहचली आहे. यासह काल विक्रमी 126 करोना रुग्णांनी करोनावर मात देखील केली आहे.

शनिवारी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये सकाळी 54 रुग्णांचे अहवाल बाधित आढळून आले. यात नगर शहर 10 (मार्केट यार्ड 3, नालेगाव 1, केडगाव 1, भिस्तबाग चौक 1, सूडके मळा 1, रेल्वे स्टेशन 1, रंगार गल्ली 1, बागडपट्टी 1). तर श्रीरामपूर 4 (यात शहरात 2, बेलापूर 1, शिरसगाव 1,). कर्जत 2 (शहर 1, माहीजळगाव 1). अकोले 4 (शहर 3, लहीत 1), जामखेड 2 (सोनेगाव 1, साकत 1). नगर ग्रामीण 03 (निंबळक 1, घोसपुरी 1, निमगाव घाना 1). पाथर्डी 1, शेवगाव 10 (शहर 5, मुंगी 5). नेवासा 3 (सोनई). पारनेर 9 (लोणी मावळा 3, पिंपळगाव रोठा 2, कर्जुले हर्या 1, कुंभार वाडी 1, वडनेर बुद्रुक 1, खडक वाडी 1), संगमनेर 6 (गुंजाळ वाडी 3, कुरण 3) अशा रुग्णांचा समावेश आहे.

रात्री उशीरा 55 रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले तर खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेल्या 78 रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. सकाळाचे 54 आणि रात्री खासगी प्रयोग शाळेचे 78 अशा 132 करोना बाधितांची नोंद जिल्ह्याच्या आकडेवारीत घेण्यात आली. यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांचा आकडा 1 हजार 571 झाला आहे.

सारांश

उपचार सुरू असलेले रुग्ण : 613

बरे झालेले रुग्ण : 920

मृत्यू : 38

एकूण रुग्ण संख्या : 1571

जिल्ह्यात शनिवारी 126 रुग्णांनी करोनावर मात केली. यात जामखेड 2, नगर ग्रामीण 3, नगर शहर 79, नेवासा 2, पारनेर 3, राहाता 7, संगमनेर 17, शेवगाव 1, श्रीगोंदा 10, श्रीरामपूर येथील 2 रुग्ण बरे होऊन घरी परतले परतले आहेत. जिल्ह्यातील 920 रुग्णांनी करोनावर मात केली आहे.

जिल्ह्यात करोना मुक्त आणि नव्याने बाधित येणार्‍यांची संख्या मोठी आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात दररोज रात्री करोना अ‍ॅक्टिव्ह केसेसची संख्या 600 च्या पुढे जाते आणि सकाळी पुन्हा मोठ्या संख्येने रुग्ण करोना मुक्त झाल्याने त्याची संख्या पुन्हा 500 ते 500 च्या दरम्यान येते. शनिवारी पुन्हा 132 रुग्णांची नोंद जिल्ह्याच्या आकडेवारीत झाल्याने अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या देखील 613 झाली होती.

रुग्णांच्या वाहतुकीसाठी रुग्णवाहिका-खासगी वाहन अधिगृहीत करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी शनिवारी काढले आहेत. ही वाहने प्राधिकृत करण्यासाठी श्रीरामपूरचे आरटीओ यांना प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. जिल्हा शल्यचिकित्सक दर आठवड्याला त्यांना जिल्ह्यातून करोना रुग्णांची ने-आण करण्यासाठी आवश्यक असणार्‍या वाहनांची संख्या कळविणार आहेत. या रुग्णवाहिका अथवा खासगी वाहनांतून करोना बाधितांच्या संपर्कात असलेली अथवा लक्षणे असणार्‍या रुग्णांना आरोग्य संस्थेत आणण्यात येणार आहे. या रुग्णवाहिका अथवा खासगी वाहन 24 तास उपलब्ध राहणार असून एका वाहनासाठी 2 चालक हे स्मार्टफोनसह हजर राहणार आहेत. चालकांकडील स्मार्टफोनवर 108 या टोल नंबरचे अ‍ॅप डाऊन लोड करून ते जिल्हा नियंत्रण कक्षाशी जोडून त्याव्दारे कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com