915 बाधितांवर उपचार, आणखी चौघांचा मृत्यू

165 पॉझिटिव्ह वाढले : जिल्ह्याची आकडेवारी 2 हजार 192
915 बाधितांवर उपचार, आणखी चौघांचा मृत्यू

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

जिल्ह्यातील करोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत जिल्ह्यातील करोना बाधितांचा आकडा 165 ने वाढला आहे. यामुळे जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या पहिल्यांदा 900 च्या पुढे सरकली आहे. जिल्ह्यात मंगळवारी 915 बाधितांवर उपचार सुरू असून मृत्यूच्या संख्येत 4 ने वाढ झाली आहे. यामुळे करोना मृत्यूचा आकडा 44 झाला आहे.

मंगळवारी गेल्या 24 तासात 165 रुग्णांची नोंद झाली. यामध्ये करोना टेस्ट लॅबमध्ये 41 रुग्ण बाधित आढळून आले तर खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेल्या आणि पोर्टलवर नोंद झालेल्या 83 रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. याशिवाय, अँटीजेन चाचण्यांत बाधित आढळलेल्या 41 रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली.

त्यामुळे उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या आता 915 इतकी झाली असून एकूण रुग्ण संख्या 2 हजार 192 इतकी झाली आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालयात करोना टेस्ट लॅबमध्ये गेल्या 24 तासांत 41 रुग्ण बाधित आढळून आले. यामध्ये राहाता 3 (साकुरी), पारनेर 4 (ढवळपुरी 2, सारोळा आडवाई 1, किन्ही 1), श्रीगोंदा 13 (घोगरगाव 4, काष्टी 1, चिकलठाणवाडी 1, चांडगाव 1, कोळगाव 1, देवदैठण 3, घारगाव 2), पाथर्डी 1 (सोनोशी), शेवगाव 2 (मंगरूळ 1, शेवगाव शहर 1), श्रीरामपूर 2, नगर ग्रामीण 3, नगर शहर 13 यांचा समावेश आहे.

याशिवाय, जलदगतीने करोना निदान करण्यासाठी आता अँटीजेन चाचण्या करण्यात येत आहेत. यामध्ये मंगळवारी 41 जण बाधित आढळले. त्यात, श्रीरामपूर 9, नेवासा 16, कोपरगाव 2, संगमनेर 10, कॅन्टोन्मेंट 1, मनपा 3 अशा रुग्णांचा समावेश आहे. खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या 83 रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली.

सारांश

उपचार सुरू असलेले रुग्ण : 915

बरे झालेले रुग्ण : 1 हजार 233

मृत्यू : 44

एकूण रुग्ण संख्या : 2 हजार 192

जिल्ह्यात मंगळवारी 100 रुग्ण करोनातून बरे होऊन घरी गेले. यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता 1 हजार 233 इतकी झाली आहे. यात जिल्ह्यात नगर ग्रामीण 2, नगर शहर 15, नेवासा 6, पारनेर 7, राहाता 1, पाथर्डी 10, कॅन्टोन्मेंट 14, राहुरी 4, संगमनेर 26, श्रीगोंदा 2, अकोले 2, कर्जत 2 आणि कोपरगाव येथील 9 रुग्ण बरे झाले आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com