करोनाचा हाहाकार : एकाच दिवशी 167 पॉझिटिव्ह

अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 516 : मृत्यूच्या आकड्यात 3 ने वाढ
करोनाचा हाहाकार : एकाच दिवशी 167 पॉझिटिव्ह

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

गुरूवारी दिवसभरात जिल्ह्यात करोना पॉझिटिव्ह आकडेवारीचा हाहाकारच समोर आला आहे. जिल्ह्यात पहिल्यांदा एकाच दिवशी सरकारी आणि खासगी प्रयोग शाळेतून 167 करोना पॉझिटिव्ह समोर आले आहेत. यामुळे जिल्ह्यातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 516 पर्यंत वाढली आहे. यासह मृतांची संख्या 3 ने वाढल्याने आता जिल्ह्यात करोना बळीची संख्या 33 झाली आहे. यामुळे खर्‍याअर्थाने जिल्ह्याची करोना संसर्गाची वाटचाल हायरिस्कच्या दिशेने सुरू असल्याचे दिसत आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये गुरूवारी दिवसभरात 115 रुग्णांचे अहवाल बाधित आढळून आले. याशिवाय, खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेल्या 52 रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 1 हजार 322 इतकी झाली असून उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 516 इतकी झाली आहे.

गुरूवारी सकाळी 32 जणांचे अहवाल बाधित आढळून आले. यामध्ये संगमनेर तालुक्यातील 11, नगर महापालिका क्षेत्रातील 16 आणि श्रीगोंदा तालुक्यातील 5 जणांचे अहवाल बाधित आढळून आले. तर दुपारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार 17 जणांचे अहवाल बाधित आढळून आले. यामध्ये पाथर्डी तालुक्यातील 10 (पाथर्डी शहर 8, कोल्हूबाई कोल्हार 2), भिंगार येथील 2, नगर तालुक्यातील 1 (घोसपुरी) आणि राहुरी तालुक्यातील 4 (राहुरी फॅक्टरी 3, म्हैसगाव 1) जणांचे अहवाल बाधित आढळून आले.

सायंकाळी पुन्हा 65 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले. यामध्ये पारनेर 4 (सिध्देश्वर वाडी 3, खडकवाडी 1) पाथर्डी 32 (आगासखांड 2, कोल्हुबाई कोल्हार 9, तिसगाव 3, त्रिभुवनवाडी 4, खाटीक गल्ली पाथर्डी 14), कोपरगाव 8 (सूरेगाव), नेवासा 1 (शिरसगाव), नगर ग्रामीण 13 (नागापूर 2, पोखर्डी 8, देऊळगाव 1, सांडवा 2), नगर शहर 2, जामखेड 3 (दिघोळ 2, लहानेवाडी 1) आणि श्रीगोंदा 1 (घोगरगाव), संगमनेर खुर्द 1, अशा रुग्णांचा समावेश आहे. यासह सरकारी पोर्टलवर आणखी तिघा करोना पॉझिटिव्ह रूग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून मृतांची संख्या 33 झाली आहे.

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून करोना संसर्गाचा कहरच सुरू आहे. यात करोना चाचणीनंतर समोर येणार्‍या आकडेवारीत जिल्ह्याचा पॉझिटिव्ह रेट 13.81 टक्के आहे. तर मृत्यूचा दर हा 2.50 टक्के आहे.

जिल्ह्यात गुरूवारी पुन्हा 46 रुग्णांनी करोनावर मात केली. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता 773 झाली आहे. तर अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 516 झाली असून मृतांची संख्या 33 झाली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com