करोना रॅपीड फास्ट : पाच हजारांच्या उंबरठ्यावर
सार्वमत

करोना रॅपीड फास्ट : पाच हजारांच्या उंबरठ्यावर

आणखी 360 रुग्णांची भर । मृतांच्या संख्येत आठने वाढ

Arvind Arkhade

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

जिल्ह्यातील करोना संसर्गाचा आकडा 5 हजारांच्या उंबरठ्यावर पोहचला आहे. शुक्रवारी जिल्ह्यात आणखी 360 करोनाबाधित आढळले. यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 4 हजार 973 झाली.

दरम्यान, जिल्ह्यातील मृतांच्या संख्येत सरकारी यंत्रणेने आठने वाढ केली आहे. यामुळे एकूण करोना बळींची संख्या 68 झाली आहे. करोनावर मात करणार्‍यांची टक्केवारी 72.21 टक्के आहे.

शुक्रवारी जिल्ह्यात नव्याने 360 करोना आढळले. यात जिल्हा रुग्णालय करोना टेस्ट लॅबमध्ये 56, अँटीजेन चाचणीत 143 आणि खाजगी प्रयोग शाळेत बाधीत आढळून आलेल्या 161 रुग्णांचा समावेश आहे. यामुळे उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या आता 1 हजार 545 झाली आहे.

शुक्रवारी पहिल्या टप्प्यात करोना बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये पारनेर तालुक्यातील सुपा येथील 1, अकोले तालुक्यातील शेरणखेल येथील 8, सुलतानपूर 1 (एकूण 9), नेवासा तालुक्यातील रास्तापुर 1, सुरेगाव 1, सुरेगावगंगा 2, नेवासा शहर 1, अंमळनेर 1 (एकूण 6), राहाता तालुक्यातील साकुरी 1, भिंगार ब्राम्हण गल्ली 1, नगर शहरातील दातरंगेमळा 1, केडगाव 2, शिवाजी नगर कल्याण रोड 1, निर्मल नगर 1, सिव्हील हॉस्पिटल 1, डीएसपी चौक 1, नगर 1, श्रमीकनगर सावेडी 1, मिल्ट्री हॉस्पिटल 6, नालेगाव 1 (एकूण 16). श्रीगोंदा तालुक्यातील जंगलेवाडी 1, नगर ग्रामीण दशमेगाव 1, श्रीरामपूर शहर 1, कोपरगाव शहर राम मंदिर रोड 1 लक्ष्मी नगर 1 आणि सुरेगाव 1 असे 3 रुग्ण समोर आले.

सायंकाळी दुसर्‍या टप्प्यात आणखी 16 करोना रुग्ण आढळून आले. यामध्ये संगमनेर तालुक्यात देवाचा मळा 3, आश्वी बु.1, घुलेवाडी 3 (एकूण 7), नगर शहरात गोविंदपुरा यशवंतनगर 1, शहर 1, आगरकर मळा 1 असे 3, नगर ग्रामीण नेप्ती 1, पारनेर तालुक्यात ढवळपुरी 1, पाडळी दर्या 1, तिखोल 2, पारनेर 1 (एकूण 5) आदी ठिकाणी रुग्ण बाधित आढळून आले.

जिल्ह्यात अँटीजेन चाचणीत शुक्रवारी 143 जण बाधित आढळून आले. यामध्ये संगमनेर 20, राहाता 5, पाथर्डी 16, नगर ग्रामीण 8, श्रीरामपुर 21, कॅन्टोन्मेंट 17, नेवासा 26, कोपरगाव 15 आणि कर्जत 15 अशा रुग्णांचा समावेश आहे. तर खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या 161 रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा 124, संगमनेर 5, राहाता 10, पाथर्डी 3, नगर ग्रामीण 5, श्रीरामपूर 3, नेवासा 1, श्रीगोंदा 1, पारनेर 1, अकोले 2, राहुरी 2, शेवगाव 1 आणि कर्जत येथील 3 रुग्णांचा समावेश आहे.

ठळक

* एकूण रूग्ण संख्या 4 हजार 973

* करोनावर मात करणारे 3 हजार 360

* सक्रीय रूग्ण 1 हजार 545

* आता पर्यंत मृत्यू 68

शुक्रवारी जिल्हा आरोग्य यंत्रणेने आणखी 411 रुग्णांना डिस्चार्ज दिला. यामध्ये, मनपा क्षेत्रातील 223, संगमनेर 53, राहाता 18, पाथर्डी 2, नगर ग्रामिण 25, श्रीरामपूर 23, कॅन्टोन्मेंट 1, नेवासा 10, पारनेर 7, राहुरी 10, शेवगाव 1, कोपरगाव 3, श्रीगोंदा 15, कर्जत 14, अकोले 5, जामखेड 1 अशा रुग्णांचा समावेश आहे. यामुळे करोनामुक्त झालेल्यांची संख्या 3 हजार 360 झाली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com