नगर जिल्ह्यात 24 तासांत 151 बाधितांची भर

मृत्यूचे अर्ध शतक पूर्ण : पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 2 हजार 771
नगर जिल्ह्यात 24 तासांत 151 बाधितांची भर
Corona

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

जिल्ह्यात करोना संसर्गाचा कहर सुरूच आहे. गेल्या 24 तासांत जिल्हा रुग्णालयाची करोना टेस्ट लॅब, अँटीजेन चाचण्या आणि खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेले असे मिळून 151 रुग्णांची नोंद झाली. यामुळे उपचार सुरू असलेल्या एकूण रुग्णांची संख्या 1 हजार 337 इतकी झाली असून जिल्ह्यातील एकूण बाधित रुग्ण संख्या 2 हजार 771 झाली आहे. दरम्यान, कालच्या मृत्यूच्या 48 च्या संख्येत गुरूवारी दोनने वाढ झाली. यामुळे मृतांचा आकडा 50 होत अर्धशतक पूर्ण झाले आहे.

गुरूवारी बाधित आढळून आलेल्यांमध्ये करोना टेस्ट लॅबमध्ये 90 जणांचे अहवाल बाधित आढळले. अँटीजेन चाचणीमध्ये 8 जण बाधित आढळले तर खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या अहवालात पॉझिटिव्ह आढळून आलेल्या आणि आयसीएमआर पोर्टलवर नोंद झालेल्या 53 रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. कालच्या बाधितांमध्ये नेवासा (3) नेवासा फाटा (1), सोनई (2), भिंगार (26) ब्राम्हणगल्ली यात (3), नेहरूचौक (3) माळीगल्ली (2) गवळीवाडा (4), कुंभारगल्ली (1), घासगल्ली (1), मोमिनगल्ली (1) विद्याकॉलनी (1) शुक्रवार बाजार (2) कँटॉनमेंट चाळ (1), सरपनगल्ली (3), पंचशिल नगर (1), काळेवाडी (1), आंबेडकर कॉलनी (1), भिंगार (1) यांचा समावेश आहे.

यासह राहुरी (7) यात वरवंडी (2), वांबोरी (1), राहुरी (1), राहुरी बु. (1), देवळाली (1), कात्रड (1), कोपरगाव (1) रवंदे (1), अकोले (6) यात पेंडशेत (1), धुमाळवाडी (1), बहिरवाडी (3), देवठाण (1), पारनेर (1) कान्हुरपठार, नगर शहर (8) एचडीएफसी बँकेजवळ (2), केडगाव (2), बागडपट्टी (1), भवानीनगर (1), प्रेमदानचौक (1), शहर मध्यवस्ती (1), नगर ग्रामीण (11) यात टाकळी खातगाव (1), बुर्‍हाणनगर (2), विळद (6) आणि निंबळक 2, शेवगाव (5) यात थाटे 3, शेवगाव शहर 2, कर्जत (1)- राशीन, श्रीगोंदा (6) काष्टी 1, बनपिंपरी 2, कोळगाव 3 राहाता (1)- गोळगाव, श्रीरामपूर (2) मुळा प्रवरा टांगे गल्ली (1) नरसाळी (1), संगमनेर (12) दाढ खु. (1), जनतानगर(1), कासार दुमाला (9), पद्मानगर (1) येथील रुग्णांचा समावेश आहे.

यासह अँटीजेन चाचणीत काल 8 जण बाधित आढळले. त्यात, श्रीरामपूर 7 आणि राहाता 1 अशा रुग्णांचा समावेश आहे.तर खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या 53 रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, श्रीरामपूर 2, संगमनेर 7, मनपा 20, राहाता 8, नगर ग्रामीण 10, पारनेर 2, पाथर्डी 1, शेवगाव 1, अकोले 2 यांचा समावेश आहे.

सारांश

* उपचार सुरू असलेले रुग्ण : 1 हजार 337

* बरे झालेले रुग्ण : 1 हजार 384

* मृत्यू : 50

* एकूण रुग्ण संख्या : 2 हजार 771

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com