जिल्ह्यात करोनाचे नव्याने 316 रुग्ण
सार्वमत

जिल्ह्यात करोनाचे नव्याने 316 रुग्ण

नगर, संगमनेरकरांची झोप उडाली, श्रीगोंद्यातही चिंता वाढली

Arvind Arkhade

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

जिल्ह्यातील करोना संसर्गाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत दोन टप्प्यात जिल्ह्यात नव्याने 316 करोना रुग्ण समोर आले आहेत. यात जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 142, अँटीजेन चाचणीत 25 आणि खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेल्या 149 रुग्णांचा समावेश आहे.

यामुळे उपचार सुरू असलेल्या एकूण रुग्णांची संख्या 1 हजार 425 इतकी झाली आहे. यासह मृतांच्या आकडेवारीत दोन ने वाढ झाली असून मृतांचा आकडा 53 वर पोहचला आहे. तर जिल्ह्यातील एकूण बाधितांचा आकडा 3 हजार 763 झाला आहे.

सोमवारी जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये दुपरपर्यंत 97 जण बाधित आढळून आले. यामध्ये, श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी 6, बनपिंप्री 1 आणि श्रीगोंदा 1 असे 8 रुग्ण. अकोले तालुक्यात गोडेवाडी 2, रेडी 1, माणीक ओझर 9 असे 12.

नगर शहरात 1, पोलीस हेड कॉर्टर 1 सारसनगर 1, शिवाजीनगर 1, किंग रोड 1, श्रमीकनगर 1, मार्केट यार्ड कर्पे मळा 1, कानडे मळा 1, जगताप मळा 1, पाईपलाईन रोड 1, हातमपुरा 4 असे 14 रुग्ण. नगर ग्रामीणमध्ये अकोलनेर 1 इमामपूर 1, कामरगाव 1, चिंचोडी पाटील 2 असे 5 रुग्ण. राहुरी तालुक्यात बाभूळलोन 1,बारागाव नांदूर 3, असे चार रुग्ण पाथर्डीत एक रुग्ण.

शेवगावमध्ये म्हसोबा नगर 1, आंतरवली खने 1 असे दोन रुग्ण. राहात्यात 1 रुग्ण, संगमनेर तालुक्यात मंगळापूर 1, जनता नगर 4, जोर्वे 4, निमगाव 1 निमगाव टेंभी 1, मालदाड रोड 4, सुकेवाडी 1, खंडोबा गल्ली 1, घोडकर गल्ली 1, नांदुरी 2, घुलेवाडी 3, माहुली 1, नांदूरखंदरमाळ 1, जेधे कॉलनी 2, पंचायत समिती 3 असे 30 रुग्ण. भिंगार सदर बजार 1, सोनसेल गल्ली 3, पंचशील नगर 3, मोनिन गल्ली 3, डॉ जयस्वाल 1 नेहरू कॉलनी 6, भिंगार खालेवाडी 1, भिंगार 1 असे 19 रुग्ण. पारनेर तालुक्यात टाकळी ढोकेश्वर 1 रुग्ण.

यानंतर सायंकाळी यात आणखी 45 रुग्णांची वाढ झाली. यामध्ये, पारनेर तालुक्यातील वाळवणे 1, सुपा 1 असे 2 रुग्ण. नगर ग्रामीणमध्ये निंबळक 1, कामरगाव 1, रुईछत्तीसी 1,वाळुंज 5 असे 5 रुग्ण. राहाता सावळीविहिर 1 आणि पुणतांबा 2 असे 3 रुग्ण. पाथर्डी शहर शंकरनगर 1 रुग्ण. नगर शहर पोलीस हेड कॉर्टर 11, नगर 3, दातरंगेमळा 1, सारसनगर 3, कल्याण रोड 1,गुलमोहर रोड 2, कपिलेश्वर नगर 1, मुकुंदनगर 2 तारकपूर (1), सिव्हिल हडको सावेडी 1 आणि पाईपलाईन रोड 5 असे 31 रुग्ण सापडेल आहेत.

अँटीजेन चाचणीत काल राहाता येथील 4, पाथर्डी 14 आणि कोपरगाव येथील 7 जण असे 25 रुग्ण बाधित आढळले. खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या 149 रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा 87, नगर ग्रामीण 17, नेवासा 1, पारनेर 9, पाथर्डी 2, राहाता 7, राहुरी 4, शेवगाव 2, कॅन्टोन्मेंट रोड 3, संगमनेर 8, कोपरगाव 4 आणि श्रीरामपूर 5 अशा रुग्णांचा समावेश आहे.

आणखी 340 रुग्णांना डिस्चार्ज

जिल्ह्यातील 340 रुग्णांना सोमवारी डिस्चार्ज देण्यात आला. यामध्ये, मनपा 222 संगमनेर 31, राहाता 18, पाथर्डी 2, नगर ग्रा.18, श्रीरामपूर 11, कॅन्टोन्मेंट 7, नेवासा 2, श्रीगोंदा 5, पारनेर:9, अकोले 1, राहुरी 9, शेवगाव 4, कोपरगाव 1 रुग्णांचा समावेश आहे. यामुळे करोना मुक्त झालेल्याची संख्या 2 हजार 285 झाली आहे.

सारांश

उपचार सुरू असलेले रुग्ण : 1 हजार 425

बरे झालेले रुग्ण : 2 हजार 285

मृत्यू : 53

एकूण रुग्ण संख्या : 3 हजार 763

Deshdoot
www.deshdoot.com