जिल्ह्यात सायंकाळी वाढले 29 रूग्ण
सार्वमत

जिल्ह्यात सायंकाळी वाढले 29 रूग्ण

Arvind Arkhade

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

अहमदनगर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये आज सायंकाळी 29 रुग्ण बाधित आढळून आले. याशिवाय, खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेल्या 31 रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली.

यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या आता 1421 इतकी झाली असून उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या 594 इतकी झाली आहे.

आज सायंकाळी जिल्हा रुग्णालय करोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये भिंगार 13, संगमनेर तालुका 06 (मालदाड रोड 01, रहेमत नगर 01, गणेश नगर 01, निमोन 01, निंबाळे01), नेवासा 05 (पुनतगाव 02, सोनई 03), नगर शहर 03, श्रीरामपूर 02 अशा रुग्णाचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेल्या 31 रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. दरम्यान आज सकाळी 21 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले होते.

Deshdoot
www.deshdoot.com