जिल्ह्यात करोना कहर सुरूच
सार्वमत

जिल्ह्यात करोना कहर सुरूच

संगमनेर, पारनेरात 4, अकोलेत तिघे बाधित, जिल्ह्यात 27 रूग्णांची भर

Arvind Arkhade

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

बुधवारी जिल्ह्यातील करोना बाधितांचा आकडा आणखी 27 ने वाढला आहे. यासह खासगी प्रयोग शाळेतील पॉझिटिव्ह सहा अहवालांची भर जिल्ह्याच्या आकडेवारीत पडली असून जिल्ह्याचा आकडा आता 728 पर्यंत वाढला आहे. यात संगमेनर तालुक्यातील करोना संसर्ग थांबण्याचे नाव घेत नसून काल पुन्हा तालुक्यात 11 बाधित आढळून आले आहेत.

जिल्हा रुग्णालयाच्या करोना चाचणी प्रयोग शाळेतून बुधवारी 206 करोना संशयितांचे अहवाल निगेटिव्ह आले असून 27 अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. यात संगमनेर तालुका 11, पारनेर तालुका 4, अकोले तालुका 3, श्रीरामपूर तालुका 3, शेवगाव तालुका 5, अहमदनगर मनपा 1 यांचा समावेश आहे.

यातील संगमनेर तालुक्यातील बाधितांमध्ये हिवरगाव पठार 1, पेमगिरी 1, पिंपळगाव कोंझिरा 3, खांडगाव 2, ढोलेवाडी 1, संगमनेर शहरातील रहेमतनगर येथे 1 तर विठ्ठलनगर येथे 2 यांचा समावेश आहे.पारनेर तालुक्यातील सावरगाव 2, कर्जुलेहर्या 1 आणि हंगा 1 रुग्ण आढळले आहेत. अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा 1, काळेवाडी 1 आणि वीरगाव येथे 1 रुग्ण, तर श्रीरामपूर शहरात काझिबाबा रोड येथे 1 आणि वॉर्ड क्रमांक 2 येथे 2 रुग्णांचा यात समावेश आहे. तसेच शेवगाव तालुक्यातील मुंगी येथे 1 तर निंबेनांदूर येथे रुग्णांसह नगर शहरात मंगलगेट येथे एक रुग्ण बाधित आढळून आला.

याशिवाय खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेल्या 6 रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यात उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या 227 झाली असून करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 481 आहे. तर आतापर्यंत 20 रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. एकूण रुग्णांची संख्या 728 असल्याची माहिती नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय यांच्याकडून देण्यात आली.

बुधवारी सकाळी जिल्ह्यातील आणखी 26 रुग्णांनी करोनावर मात करत घरी परतले. यात, नगर मनपा 14, कोपरगाव 3, पाथर्डी 2, राहाता 2, राहुरी 4, श्रीरामपूर 1 यांचा समावेश आहे. यामुळे करोनामुक्त झालेल्यांची संख्या आता 481 झाली आहे.

जिल्ह्यासह नगरमध्ये मोठ्या संख्येने खासगी लॉबमधून करोना चाचणी करून घेण्यात येत आहे. दुसरीकडे याठिकाणी पॉझिटिव्ह येणार्‍या रुग्णांची नोंद उशीराने जिल्ह्याच्या आकडेवारीत होत आहे. यामुळे खासगी लॉबमधून करोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांचा आकडा वाढत असून तो एकदम जिल्ह्याच्या आकडेवारीत अ‍ॅड केल्यामुळे जिल्ह्याची आकडेवारी एकमद फुगत आहे. यामुळे खासगी लॅबचे अहवाल त्याच दिवशी जिल्ह्याच्या आकडेवारीत समावेश होणे गरजेचे बनले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com