करोना
करोना
सार्वमत

जिल्ह्यात पॉझिटिव्हच्या संख्येत 117 ची वाढ

भिंगार, संगमनेरात करोनाच कहर सुरूच, शिर्डी, नेवाशात प्रत्येकी 5 जणांना बाधा

Arvind Arkhade

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

जिल्ह्यात करोना संसर्गाचा हाहाकार सुरूच आहे. शुक्रवारी दिवसभरात नव्याने 99 करोना रुग्ण समोर आले आहेत. यासह गुरूवारी रात्री उशीरा 18 व्यक्तींना करोनाची लागण झाल्याचा अहवाल आला होता. यामुळे जिल्ह्याच्या करोना बाधितांच्या आकडेवारीत 117 ची भर पडली, तर एकूण आकडेवारी 1 हजार 439 झाली आहे. यात 616 उपचार घेणारे रुग्ण आहेत.

जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये शुक्रवारी सकाळी 21 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले तर गुरूवारी रात्री उशीरा 18 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले होते. काल सकाळी आलेल्या अहवालानुसार, पारनेर तालुक्यातील 3 (साबळेवाडी 1, नांदूरपठार 1 आणि पळसपूर 1). भिंगार येथील 10, नगर ग्रामीण मधील 3 (वाकोडी 1, डोंगरगण 1), श्रीगोंदा तालुक्यातील 5 (कोळगाव 3, लोणी व्यंकनाथ 2) रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले.

दरम्यान, गुरुवारी रात्री 18 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले. यामध्ये संगमनेर 12 (कुरण 2, राजापूर 1, बागवानपुरा 4, घुलेवाडी 1, सय्यदबाबा चौक 3, सुकेवाडी 1), नगर शहर 5, आणि अकोले 1 (कळंब) असे बाधित रुग्ण आढळून आले.

सायंकाळी नव्याने 29 करोना रुग्ण समोर आले. जिल्हा रुग्णालयातून सायंकाळी आलेल्या अहवालात भिंगार 13, संगमनेर तालुका 6 (मालदाड रोड 1, रहेमत नगर 1, गणेश नगर 1, निमोन 1, निंबाळे 1), नेवासा 5 (पुनतगाव 2, सोनई 3), नगर शहर 3, श्रीरामपूर 2 अशा रुग्णाचा समावेश आहे.

रात्री आठच्या सुमारास जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये आणखी 18 रुग्णांचे अहवाल बाधित आढळून आले. यात भिंगार 2, नगर शहर 5, श्रीरामपूर 3, श्रीगोंदा 3 (घोगरगाव 2 सांगवी दुमाला 1), कर्जत 1 (नांदगाव), राहुरी 1 (गुहा), अकोले 3 अशा रुग्णांचा समावेश आहे. तर खासगी प्रयोग शाळेतील बाधित आलेल्या 31 रुग्णांंची नोंद जिल्ह्यातच्या आकडेवारीत वाढविण्यात आली.

सारांश

*उपचार सुरू असलेले रुग्ण : 616

* बरे झालेले रुग्ण : 794

* मृत्यू : 33

*एकूण रुग्ण संख्या : 1439

शुक्रवारी आणखी 22 करोना रुग्णांनी करोनावर मात केली. यात अकोले 1, नगर ग्रामीण 2, नगर शहर 1, पारनेर 2, संगमनेर 15,श्रीरामपूर येथील 1 रुग्ण बरे होऊन परतले घरी. यामुळे करोना मुक्त झालेल्याची संख्या 795 झाली आहे.

नगर जिल्ह्यातील आणि विशेष करून शहरात करोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. यामुळे नगर शहर लॉकडाऊन करावे की नाही, याबाबत विचारविनियम आणि चर्चा करण्यासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज सकाळी 11 वाजता ऑनलाईन बैठकीचे आयोजन केले आहे. यावेळी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह, मनपा आयुक्त श्रीकांत मायकलवार, जिल्हाशल्यचिकित्सक डॉ.प्रदीप मुरंबीकर यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित राहून करोना संसर्गाचा विद्यमान परिस्थितीचा आढावा देणार आहेत. त्यानंतर नगरच्या लॉकडाऊनचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

पारनेर 3, भिंगार 25, नगर ग्रामीण 3, श्रीगोंदा 8, संगमनेर 18, नगर शहर 13, अकोले 4, नेवासा 5, श्रीरामपूर 5, कर्जत 1, राहुरी 1 यासह खासगी प्रयोग शाळांचे 31 अहवाल पॉझिटिव्ह.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com