जिल्ह्यात दिलासा : करोनाचे केवळ 17 नवीन रुग्ण

आता दररोज 1000 चाचण्या होणार
Corona
Corona

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळपर्यंत करोना रुग्णांची 17 ने वाढ झाली. त्यामुळे उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या आता एक हजार 302 इतकी झाली असून एकूण रुग्ण संख्या दोन हजार 788 इतकी झाली आहे.

शुक्रवारी 53 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता एक हजार 436 इतकी झाली आहे. दरम्यान, आता, जिल्हा रुग्णालय येथील कोरोना टेस्ट लॅबमध्ये आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या वाढणार आहे. सध्या असलेली प्रतिदिन 300 चाचण्यांची क्षमता आता प्रतिदिन एक हजार अशी होणार आहे.

त्यासाठी आवश्यक असणारे एक्स्ट्रॅक्टर उपलब्ध झाले असून सोमवारपासून अधिक चाचण्या होऊ शकणार आहेत. याशिवाय, जिल्ह्यासाठी 50 हजार अँटीजेन किटसची मागणी नोंदविली आहे. ते लवकरच प्राप्त होत असून मोठ्या प्रमाणात चाचण्या घेता येणार आहेत.

जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी (1), जोर्वे (1), अभंग मळा (1) आणि अशोक चौक (1) येथील रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत तीन जण बाधित आढळले. त्यात, श्रीरामपूर (2) आणि राहाता (1) येथील रूग्ण आहेत. खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या 10 रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, श्रीरामपूर (1), संगमनेर (7), नगर शहर (1), राहाता (1) येथील रुग्णांचा सामावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत करोनाने मृत्यू पावलेल्यांची संख्या 50 एवढी झाली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com