नगर जिल्ह्यात 24 तासात 428 करोना पॉझिटिव्ह

नगर जिल्ह्यात 24 तासात 428 करोना पॉझिटिव्ह

एकूण बाधित 2 हजार 620, मृतांचा आकडा अर्धशतकाजवळ

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

जिल्ह्यात गेल्या 24 तासांत जिल्हा रुग्णालयाची करोना टेस्ट लॅब, अँटीजेन चाचण्या आणि खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेले असे मिळून एकूण 428 रुग्णांची नोंद झाली. यामुळे जिल्ह्यातील बाधितांचा आकडा 2 हजार 620 झाला असून उपचार घेत असलेल्यांची संख्या 1 हजार 281 झाली आहे. तर मृतांच्या आकडेवारीत पुन्हा चारने वाढ झाली असून आता जिल्ह्यात करोना बळींची संख्या 48 झाली आहे.

बुधवारी जिल्हा रुग्णालयातील करोना टेस्ट लॅबमध्ये 84 जणांचे अहवाल बाधित आढळले. अँटीजेन चाचणीमध्ये 44 जण बाधित आढळले तर खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या अहवालात पॉझिटिव्ह आढळून आलेल्या आणि आयसीएमआर पोर्टलवर नोंद झालेल्या 300 रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामुळे उपचार सुरू असलेल्या एकूण रुग्णांची संख्या आता 1 हजार झाली आहे.

मंगळवारी सायंकाळपासून बुधवारी दुपारपर्यंत जिल्हा रुग्णालयाच्या रुग्ण संख्येत 70 ने वाढ झाली. त्यानंतर पुन्हा 14 रुग्णांचे अहवाल बाधित आढळून आले. त्यामुळे याठिकाणी 24 तासांत 84 रुग्ण बाधित आढळून आले. यामध्ये, संगमनेर तालुका 25, पारनेर तालुका 1, श्रीगोंदा तालुका 15, नगर शहर 13, नगर ग्रामीण 22, श्रीरामपूर 3, राहुरी 1, अकोले 2, कर्जत 2 अशा रुग्णांचा समावेश आहे.

यातील नगर शहरातील स्टेशन रोड, सावेडी, सारडा गल्ली, सावेडी, केडगाव, पंचपीर चावडी, सिध्दार्थ नगर, नगर शहर मध्यवस्ती आदी भागातील 13 रुग्णांचा यात समावेश आहे. संगमनेर नगर रोड, मालदाड रोड, रायते, निमगांव जाळी, नांदूरदुमाला 8, पिंपळगाव देपा 3, शिबलापूर 2,घास बाजार 4 ,बाजारपेठ 2, घुलेवाडी 2 अशा 25 रुग्णांचा समावेश आहे. नगर ग्रामीणमधील बुर्‍हाणनगर 16, ब्राम्हण गल्ली भिंगार, नागरदेवळे, टाकळी खातगाव 4 अशा 22 रुग्णांचा समावेश आहे.

यासह राहुरी 1 यात कात्रड येथील एका रुग्णाचा, श्रीरामपूर शहरातील 3 रुग्णांचा, पारनेर तालुक्यातील पाडळी दर्याच्या एका रुग्णांचा, श्रीगोंदा देवदैठण, हिंगेवाडी, बेलवंडी असे 4, काष्टी 5, चिकलठाणवाडी 01, निमगाव खलू 1 अशा एकूण 15 रुग्णांचा, कर्जत निंबोडी, कोळवडी येथील प्रत्येकी 1 अशा दोन रुग्णांचा आणि अकोले शहरातील 2 रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत 44 जण बाधित आढळले. त्यात, श्रीरामपूर 3, नेवासा 6,कोपरगाव 2, संगमनेर 21, कॅन्टोन्मेंट 4, मनपा 3 आणि राहाता 5 अशा रुग्णांचा समावेश आहे.खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या 300 रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली.

आणखी 58 करोनामुक्त

बुधवारी आणखी 58 रुग्णांनी करोनावर मात केली आहे. यात नगर ग्रामीण 6, नगर शहर 5, राहाता 1, पाथर्डी 14, कॅन्टोन्मेंट 5, संगमनेर 16, श्रीगोंदा 6, जामखेड 3, श्रीरामपूर 2 यांचा समावेश आहे. यामुळे करोनामुक्त झालेल्यांची संख्या आता 1 हजार 291 झाली आहे.

मृतांचा आकडा अर्ध शतकाजवळ

जिल्ह्यात करोना बाधितांसोबत आता मृतांचा आकडा वाढण्यास सुरूवात झाली आहे. काल जिल्ह्यात करोनामुळे मृत पावलेल्या रुग्णांची संख्या 44 होती. यात काल सकाळी 2 आणि सायंकाळी 2 ने वाढ झाली आहे. यामुळे मृतांचा आकडा अर्ध शतकाच्या दिशेने असून आतापर्यंत 48 व्यक्ती मरण पावल्या आहेत.

सारांश

*उपचार सुरू असलेले रुग्ण : 1 हजार 281

*बरे झालेले रुग्ण : 1 हजार 291

*मृत्यू : 48

*एकूण रुग्ण संख्या : 2 हजार 620

शहरातील एका व्यक्तीचा मृतदेह दफन विधी करण्यासाठी मनपा रुग्णवाहिकेतून नेण्यात येत होता. रुग्णवाहिकेचा दरवाजा अचानक उघडल्याने मृतदेह थेट रस्त्यावर पडला. दरवाजाचा नादुरुस्त असल्याने हा प्रकार घडल्याचे मनपा आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. मनपा यंत्रणा शहरातील बेवारस मृतदेह सोपविल्यानंतर विल्हेवाटीसाठी वारुळाचा मारुती परिसरात दफन करण्यासाठी नेण्यात येतात. मंगळवारी बेवारस मृतदेह घेऊन जात असताना जिल्हा रुग्णालयासमोर रुग्णवाहिकेचा दरवाजा अचानक उघडला गेल्याने मृतदेह रस्त्यावर पडला. हा रस्ता वर्दळीचा असल्याने मृतदेह रस्त्यावर पडताच याठिकाणाहून प्रवास करणार्‍यांमध्ये एकच भितीचे वातावरण निर्माण झाले. हा मृत करोनाचा की अन्य कोणता यावर बरीच चर्चा झाली. अखेर या बेवारस व्यक्तीचा मृत देह असून तो ठेकेदारामार्फत दफनविधीसाठी नेण्यात येत होता. मात्र, रुग्णवाहिकेच्या दरवाजाची कडी खराब असल्याने दरवाजा उघडल्याने हा मृतदेह रस्त्यावर पडल्याचे मनपा आरोग्य विभागाने सांगितले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com