जिल्ह्यात करोनाचा कोप सुरूच
सार्वमत

जिल्ह्यात करोनाचा कोप सुरूच

जिल्ह्यात तिघांचा बळी

Arvind Arkhade

श्रीगोंद्यात तरुणाचा मृत्यू, नगरमध्ये डॉक्टर, बडा नेता करोना पॉझिटिव्ह, संगमनेरात 55 जणांना बाधा

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

जिल्ह्यात करोना संसर्गाची व्याप्ती आता मोठ्या प्रमाणात वाढण्यास सुरूवात झाली आहे. गेल्या 24 तासांत जिल्ह्याच्या रुग्ण संख्येत 161 ने वाढ झाली. यामध्ये जिल्हा रुग्णालय करोना टेस्ट लॅबमध्ये 90, अँटीजेन चाचणीत 26 आणि खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेल्या 45 रुग्णांचा समावेश आहे.

यामुळे उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या आता 1 हजार 452 इतकी झाली आहे. मंगळवारी ताप आणि श्वसनाचा त्रास नसणार्‍या 133 रुग्णांना रुग्णायलयातून डिस्चार्ज देण्यात आला. दरम्यान, जिल्ह्यातील एकूण बाधितांची एकूण संख्या 3 हजार 924 झाली असून सरकारी मृतांचा आकडा एकने वाढत 54 झाला आहे.

मंगळवारी सकाळी नगरच्या खासगी कोव्हिड सेंटरमध्ये उपचार सुरू असताना जिल्हा परिषदेच्या एका अधिकार्‍याचा मृत्यू झाला. त्यानंतर सायंकाळी नगरमधील एका सुप्रसिध्द मिठाईवाला वय 79 यांचा मृत्यू झाला. संबंधित व्यक्तीचा करोनाचा अहवाल पॉझिटिव्ह होता. यासह नगर शहरातील ‘नेता’ चौकातील एक बडा नेता आणि त्याच्या कुटुंबाला करोना झाला आहे. याबाबतचा अहवाल आरोग्य विभागाला मंगळवारी दुपारी उशीरा प्राप्त झाला होता. श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी

मधील तीस वर्षीय तरुणांचा करोनामुळे मृत्यू झाला असताना सलग दुसर्‍या दिवशी तांदळी दुमाला गावातील 50 वर्षीय व्यक्तीचा करोनाच्या उपचारादरम्यान मृत्यु झाल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.नितीन खामकर यांनी दिली.संगमनेर शहर आणि तालुक्यात काल तब्बल 55 रूग्णांची भर पडली आहे. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या 654 वर पोहचली आहे.

दरम्यान, जिल्हा रुग्णालयात एका नाक-कान-घसा तज्ज्ञाला करोना झाला असून मंगळवारी यात आणखी तीन डॉक्टर आणि रुग्णालयातील अन्य सहा कर्मचार्‍यांना करोनाची बाधा झाली असल्याची माहिती सुत्रांनी दिली. तसेच भिंगार छावणी मंडळाच्या प्रशासनात करोनाचा शिरकाव झाला असून याठिकाणी सुरक्षा विभागातील एका प्रमुखाला करोना झाला आहे.

यासह शहरातील एका बड्या नेत्याला आणि त्याच्या कुटुंबाला देखील करोनाची बाधा झाली आहे. यासह जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकार्‍यांसह कर्मचारी अशा 10 जणांना करोना झाला असून भिंगार छावणी मंडळाचा सुरक्षा विभागातील एका करोनाची लागण झाली आहे.

मला करोना झालेला नाही- जिल्हा शल्यचिकित्सक

मी करोना बाधित असल्याचे चुकीचे वृत्त काहींनी ऑनलाईन प्रसार माध्यमांवर प्रसारित केले. हे अतिशय दुर्दैवी आणि शहानिशा न करता केलेले कृत्य आहे. याबाबत कोणीही माझ्याशी संपर्क साधून वस्तुस्थिती जाणून न घेता एकतर्फी आणि चुकीच्या बातम्या सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित केल्या. त्यामुळे अशा कोणत्याही खोट्या गोष्टींवर अथवा अफवांवर कोणीही विश्वास ठेऊ नये, मला करोना झालेला नाही, असे स्पष्टीकरण जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीपकुमार मुरंबिकर यांनी मंगळवारी रात्री उशीरा दिले आहे. नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनीही मंगळवारी सायंकाळपर्यंत असा कोणताही अहवाल आला नसल्याचे सांगितले.

मंगळवारी जिल्हा रुग्णालयाच्या करोना प्रयोग शाळेतून आलेल्या अहवालात नव्याने 54 करोना बाधित रुग्ण समोर आले. यात नेवासा तालुक्यातील कुकाणा 7, शिरसगाव 1, नेवासा खुर्द 3 अशा 11 रुग्णांचा समावेश होता. संगमनेर तालुका रायतेवाडी 1, सावरगाव 3 आणि राजश्री हॉटेल घारगाव 1 असे 5 रुग्ण. श्रीगोंदा तालुक्यात खरातवाडी 1, शनी चौक 1, जनगळेवाडी 1,पारगाव 2, शेंडगेवाडी 1, बेलवंडी कोठार 1, काष्टी 3 असे 10 रुग्ण. कोपरगाव तालुक्यात पडेगाव 4, सुरेगाव 1, गांधीनगर 2 असे 7 रुग्ण. पाथर्डी तालुक्यात नवनाथ पाथर्डी 1, कोरडगाव 1, जिरेसाल गल्ली 5, वामनभाऊ नगर 1,कासार गल्ली 1, शेवाळे गल्ली 1 असे 10 रुग्ण. नगर महापालिका हद्दीत पंकज कॉलनी 1, ज्ञानप्रा हॉस्टेल 1, शिवाजी नगर 1, पाईपलाईन रोड 1, सावेडी 1, बालिकाश्रम रोड 2, गुलमोहर रोड 1 असे 8 रुग्ण. नगर ग्रामीणमध्ये सारोळा कासार 1 रुग्ण, पारनेर तालुक्यात नांदूर पठार 1 आणि बीड जिल्ह्यातील आष्टी-लोणी सय्यद मिर 1 येथील एका रुग्णांचा समावेश होता.

सायंकाळी जिल्हा रुग्णालयाच्या सरकारी लॉबच्या रिपोर्टनुसार बाधित रुग्णांमध्ये आणखी 36 रुग्णांची भर पडली. यात नगर शहरातील पोलीस हेड कॉर्टर 2, चितळे रोड 1, सारसनगर 1 असे 4, संगमनेर तालुक्यातील साईनाथ चौक 1,आश्वि बुद्रुक ,3 चंद्रशेखर चौक 1,कुरण रोड 2,खंडोबा गल्ली 3, पावबाकी रोड 2, तहसील कचेरी 1, निमगाव पागा 3, शेडगाव 3, इस्लामपुरा 1, इंदिरानगर 1, घुले वाडी 1, जॉर्वे 1, पद्मानगर 1 असे 24 रुग्ण. अकोले तालुक्यात जांभाळे येथे 1 रुग्ण, नाशिक शहरातील जेलरोड नाशिक 4 आणि सिडको 1 असे पाच रुग्ण. पाथर्डी 1, श्रीगोंदा 1 या रुग्णांचा समावेश होता.

अँटीजेन चाचणीत मंगळवारी 26 जण बाधित आढळून आले. यामध्ये भिंगार कॅन्टोन्मेंट 1, नगर ग्रामीण 1, पाथर्डी 3, संगमनेर 6 आणि श्रीरामपूर 15 रुग्णांचा समावेश आहे. खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या 45 रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये नगर मनपा 25, जामखेड 3, कोपरगाव 1, नगर ग्रामीण 2, पारनेर 2 पाथर्डी 3, राहाता 5, राहुरी 1, संगमनेर 2 आणि शेवगाव येथील एका रुग्णाचा समावेश आहे.

आणखी 133 रुग्णांना डिस्चार्ज

मंगळवारी आणखी 133 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामध्ये मनपा 34, संगमनेर 6, राहाता 8, पाथर्डी 1, नगर ग्रामिण 27, श्रीरामपूर 2, कॅन्टोन्मेंट 26, नेवासा 3, श्रीगोंदा 9, पारनेर 2, अकोले 8, राहुरी 5, शेवगाव 1, कर्जत 1 अशा रुग्णांचा समावेश आहे. यामुळे करोनावर मात केलेल्याची संख्या आता 2 हजार 418 झाली आहे.

औरंगाबादहून पुण्याला जात असताना मंगळवारी सायंकाळी आरोग्य मंत्री राजेश टोपे नगरमध्ये थांबले. त्यांना केंद्रीय आरोग्य खात्याशी व्हिसी असल्याने त्यांनी नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयातून या व्हिसीला हजेरी लावली. व्हिसी संपल्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडून जिल्ह्यातील करोनाचा आढावा घेतला. त्यात जिल्ह्यातून जास्तीजास्त करोना चाचण्या करा, विशेष करून झोपडपट्टी भागात चाचण्या वाढवा, करोना रुग्णांना संस्थात्मक विलग करा आदी सूचना दिल्या. पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंगसह जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यावेळी हजर होते.

Deshdoot
www.deshdoot.com