चायना मांजा विक्रीवर दक्षता पथकाचे लक्ष

शहरातील पतंग स्टॉलची केली तपासणी
चायना मांजा विक्रीवर दक्षता पथकाचे लक्ष

अहमदनगर (प्रतिनिधी)

शासनाने नायलॉनच्या घातक चायना मांजावर बंदी घातलेली असताना, सर्रास बाजारात चायना मांजाची विक्री होत आहे. या चायना मांजामुळे स्वतःच्या आणि इतरांच्या जिवावर संक्रांत येऊ शकते. त्यामुळे अहमदनगर महापालिकेच्या दक्षता पथकांकडून शहरातील पतंग स्टॉलवर शुक्रवारी तपासणी करण्यात आली. चायना मांजा विक्री करताना आढळल्यास मनपाकडून कारवाई करण्यात येणार आहे.

चायना मांजा विक्रीवर दक्षता पथकाचे लक्ष
Sagarika Ghatge Birthday: राजघराण्यातली मुलगी, अभिनेत्री म्हणून करिअर, शाहरुखसोबत ब्लॉकबस्टर हिट!

शासनाने नायलॉनच्या घातक चायना मांजावर बंदी घातली असली तरी, बाजारामध्ये सर्रास चायना मांजाचे बंडल सहजरित्या उपलब्ध होत आहे. या चायना मांजामुळे पक्षी तर जखमी होतातच, शिवाय लहान मुलांची बोटेसुद्धा कापली जातात. पतंग उडवताना, मांजा अनेकांच्या गळ्यात अडकल्यामुळे प्राण गमवावे लागले आहेत. अनेक दुचाकीस्वारांचा गतीमुळे क्षणात गळा कापला जाऊ शकतो. मांजामुळे चेहऱ्यालासुद्धा इजा होऊन, त्वचा कापली जाते.

चायना मांजा विक्रीवर दक्षता पथकाचे लक्ष
Irrfan Khan Birth Anniversary : आठवणीतला इरफान खान…

यामुळे अहमदनगर शहरात नायलॉनच्या घातक चायना मांजावर विक्रीवर मनपाच्या दक्षता पथकाकडून लक्ष ठेवले जात आहे. शुक्रवारी पथकाने अहमदनगर शहरातील बागडपट्टी, तोफखाना, चितळे रोड परिसरातील पतंग स्टॉलची तपासणी केली.

चायना मांजा विक्रीवर दक्षता पथकाचे लक्ष
“घाई घाईने RIP लिहिण्याच्या या जगात...”; पडद्यावर 'सिंधुताई' साकारणाऱ्या तेजस्विनीची पोस्ट चर्चेत

यावेळी दक्षता संनियंत्रण अधिकारी शशिकांत नजान यांच्यासह दक्षता पथकातील नंदकुमार नेमाणे, राहुल साबळे, राजेंद्र बोरुडे, अमोल लहारे. विष्णू देशमुख, राजू जाधव, भास्कर आकुबत्तीन, गणेश वरुटे, रिजवान शेख, विष्णू मिसाळ, नंदकुमार रोहकले, भीमराज कांगुडे, गणेश धाडगे, अनिल कोकणे आदी उपस्थित होते.

चायना मांजा विक्रीवर दक्षता पथकाचे लक्ष
बॉलिवूड सेलिब्रिटी करोनाच्या विळख्यात!

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com