ई- करार करूनच वर्ग दोनच्या जमिनीवर मिळणार पीक कर्ज

जिल्हा बँकेचा निर्णय : श्रीरामपूर, राहाता, शेवगाव, पाथर्डीला होणार लाभ
File Photo
File Photo

अहमदनगर (प्रतिनिधी)

शेती महामंडळ, पुनर्वसन म्हणून मिळालेल्या जमिनी, स्वातंत्र्य सैनिकांना मिळालेल्या जमिनी यावर आता ई-करार करून जिल्हा बँक पिक कर्ज देणार आहे. याबाबतचा निर्णय शुक्रवारी झालेल्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

जिल्हा बँकेच्या कार्यकारी मंडळाची काल बैठक झाली. बैठकीला उपाध्यक्ष माधवराव कानवडे, ज्येष्ठ संचालक भानुदास मुरकुटे, शिवाजीराव कर्डिले, अण्णासाहेब म्हस्के, सीताराम गायकर, अरूण तनपुरे, गणपतराव सांगळे, प्रशांत गायकवाड आणि सीईओ रावसाहेब वर्पे आदी उपस्थित होते.

बैठकीत वर्ग दोनच्या जमिनीवर देण्यात येणाऱ्या पीक कर्ज आणि त्याबाबतच्या अडचणीवर चर्चा झाली. पूर्वी बँक स्टॅम्प पेपर लिहून घेऊन वर्ग दोनच्या जमिनीवर पीक कर्ज देत होती. मात्र, हे कर्ज दिल्यानंतर परतफेडीच्या वेळी तक्रारी होत होत्या. यामुळे बँकेच्या संचालक मंडळाने ई-करार करूनच वर्ग दोनच्या जमिनीवर पीक कर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे.

यामुळे श्रीरामपूर आणि राहाता तालुक्यातील शेती महामंडळाच्या जमिनी असणाऱ्या शेतकऱ्यांना तर शेवगाव तालुक्यातील पुनर्वसन होवून जमिनी मिळालेल्या शेतकऱ्यांना पीक कर्ज घेण्यासाठी जिल्हा बँकेच्या या निर्णयाचा फायदा होणार आहे.

डॉ. तनपुरेबाबत निर्णय

कार्यकारी मंडळाच्या बैठकीत मागील वर्षीप्रमाणे करार आणि अटी शर्तीवर राहुरीचा डॉ. तनपुरे साखर कारखाना संचालक मंडळाला चालवण्यास देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राहुरी तालुक्यातील शेतकरी आणि ऊस उत्पादक यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com