
अहमदनगर (प्रतिनिधी)
एका व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाचे (वय 16) अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. यासंदर्भात त्याच्या वडिलांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महावीर पार्कसमोर, विडीओकॉनजवळ राहणारे व्यावसायिकाचे नगर-पुणे रोडवरील सक्कर चौक येथे पेट्रोलपंप व हॉटेल आहे. त्यांचा मुलगा शहरातील एका कॉलेजमध्ये अकरावीचे शिक्षण घेतो. तो बुधवारी सकाळी त्यांच्या पेट्रोलपंप व हॉटेलवर आला होता.
दरम्यान त्यानंतर तो घरी न जाता बेपत्ता झाला. फिर्यादी, नातेवाईक व त्यांच्या कामगारांनी मुलाचा शोध घेतला परंतू तो मिळून आला नाही. यानंतर त्याच्या वडिलांच्या फिर्यादीवरून पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जुनी महानगरपालिकासमोर कामानिमित्त आलेला एक 35 वर्षीय तरूण बेपत्ता झाला आहे. बंडु भिवा वामन (रा. देवगाव ता. नगर) असे बेपत्ता तरूणाचे नाव आहे. यासंदर्भात त्याचे वडिल भिवा नानाभाऊ वामन (वय 60 रा. देवगाव) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोतवाली पोलीस अल्पवयीन मुलासह तरूणाचा शोध घेत आहेत.