12 जणांच्या टोळक्याकडून तिघांना मारहाण

जनावरांचा टेम्पो अडविण्याचे कारण; दोघे अटकेत
12 जणांच्या टोळक्याकडून तिघांना मारहाण

अहमदनगर (प्रतिनिधी)

गोवंशीय जनावरांची वाहतुक केली जात असलेला संशयित टेम्पो अडविल्याच्या कारणातून तिघांना मारहाण करण्यात आली. गुरूवारी (दि. 3) रात्री साडे दहा वाजता चांदणी चौकात आरटीओ कार्यालयासमोर ही घटना घडली.

मारहाणीत चांगदेव गोरख भालसिंग (वय 31, रा. धोंडेवाडी, वाळकी, ता. नगर), अविनाश सतिष सरोदे (रा. वाळुंज, ता. नगर) व मनोज फुलारी (पूर्ण नाव माहिती नाही, रा. शिराढोण, ता. नगर) हे जखमी झाले आहेत. जखमी भालसिंग यांनी शुक्रवारी (दि. 4) पहाटे भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून निहाल कुरेशी व गुफरान कुरेशी (दोघे रा. झेंडीगेट) व अनोळखी 10 ते 11 जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, निहाल कुरेशी व गफरान कुरेशी यांना दोघांना स्थानिक गुन्हे शाखा व भिंगार कॅम्प पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली आहे.

भालसिंग व त्यांचे दोन मित्र शिराढोणकडे जात असताना त्यांना गोवंशीय जनावरे वाहतूक करणारा संशयित टेम्पो (एमएच 16 एवाय 6710) दिसला असता त्यांनी पाठलाग केला. दरम्यान, टेम्पो चालकाने वाहन न थांबविता निघून गेला. भालसिंग व त्यांचे दोन मित्र आरटीओ कार्यालयाजवळ थांबले असता त्यांना निहाल कुरेशी, गफरान कुरेशी व 10 ते 11 अनोळखींनी मारहाण केली. दोन मोबाईल व एक हजार रूपये काढून घेतले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, सहा. निरीक्षक दिनकर मुंडे, सहा. निरीक्षक हेमंत थोरात, उपनिरीक्षक किरण सोळंके, उपनिरीक्षक मंगेश बेंडकोळी, अंमलदार भाऊसाहेब काळे, बबन मखरे, विश्‍वास बेरड, संदीप घोडके, दीपक शिंदे, राहुल व्दारके यांच्या पथकाने दोघांना तात्काळ अटक केली.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com