महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्राची चोरी

महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्राची चोरी

दोघांवर गुन्हा

अहमदनगर (प्रतिनिधी)-

भाजीपाला खरेदी करत असलेल्या महिलेच्या गळ्यातील एक तोळ्याचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या दोघांनी चोरून नेले.

सावेडीतील बालिका श्रमरोडवरील लबडे हॉस्पिटलसमोर शनिवारी रात्री नऊ वाजता ही घटना घडली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अज्ञात दोघांविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

आश्विनी आशिष राठोड (वय ३० रा. शिंदे मळा, बालिका श्रमरोड) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी या नऊ वाजताच्या सुमारास बालिकाश्रम रोडवरील लबडे हॉस्पिटलसमोर भाजीपाला खरेदी करत होत्या. त्यावेळी दुचाकीवरून दोघे जण त्यांच्याजवळ आले. पाठीमागे बसलेल्या इसमाने फिर्यादी यांच्या गळ्यातील एक तोळ्याचे मंगळसूत्र ओरबडले. काही क्षणात घडलेल्या या घटनेमुळे फिर्यादी गोंधळून गेल्या होत्या.

घटनेची माहिती तोफखाना पोलिसांना देण्यात आली. शहर उपअधीक्षक विशाल ढुमे, सहायक निरीक्षक किरण सुरसे यांनी घटनास्थळी भेट दिली असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे करीत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com