दरोड्याच्या गुन्ह्यातील श्रीरामपूरचा आरोपी जेरबंद

दरोड्याच्या गुन्ह्यातील श्रीरामपूरचा आरोपी जेरबंद

अहमदनगर (प्रतिनिधी)

पोलीस असल्याची बतावणी करून टेम्पो चालकावर दरोडा टाकणाऱ्या टोळीतील एकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. शोएब गुलाब कुरेशी (वय २२ रा. वार्ड नंबर २, श्रीरामपूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. यापूर्वी पाच आरोपींना एलसीबीने अटक केली आहे.

२७ मे रोजी श्रीधर जंगलू सोनवणे (रा. एकलहरे ता. श्रीरामपूर) हे टेम्पोमध्ये लोखंड, अॅल्युमिनियम, पितळ, तांबे असा सुमारे पाच लाखाचे भंगार घेवून जात असताना राहुरी तालुक्यातील शनिशिंगणापूर फाट्याजवळ कारमध्ये आलेल्या लुटारूंनी टेम्पोला अडविले. त्यांच्याकडून टेम्पोसह भंगार चोरून नेले होते.

याप्रकरणी एलसीबीने तपास करून पाच जणांना अटक केली होती. त्यातील शोएब कुरेशी पसार होता. तो श्रीरामूपरमध्ये आल्याची खबर पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती. त्यांनी एक पथक पाठवून कुरेशी याला अटक केली. त्याच्याविरोधात श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com