
अहमदनगर (प्रतिनिधी)
शेवगाव शहरात आज पहाटे दरोडेखोरांनी केलेल्या हल्ल्यात एकाच कुटुंबातील दोघे ठार झाले असून एक महिला जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. बलदवा कुटुंबावर दरोडेखोरांनी हल्ला केला आहे. या घटनेमुळे शेवगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.
जिल्ह्यात सातत्याने खुन, दरोड्याच्या घटना घडत आहे. पोलीस यंत्रणेवर ताण वाढला असून आता पुन्हा आज पहाटे शेवगाव शहरात दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला आहे. बलदवा कुटुंबावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्लात दोघे ठार झाले असून बलदाव कुटुंबाची महिला जखमी झाली आहे. तिला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरोडेखोरांनी घरातील काही ऐवज लुटला आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली आहे. फिंगरप्रिंट, डॉगस्काॅड पथकही पाचारण करण्यात आले आहे.