अखेर 'त्या' तीन पोलिसांना अटक

अखेर 'त्या' तीन पोलिसांना अटक

लाच मागणी प्रकरण: 24 जूनपर्यंत पोलीस कोठडी

अहमदनगर | Ahmedagar

शेवगाव उपविभागीय अधिकारी सुदर्शन मुंढे यांच्या पथकातील तीन कर्मचार्‍यांवर 15 हजार रूपये लाच मागणीचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात त्यांना जिल्हा न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर ते तिघे कर्मचारी लाचलुचपत विभागाच्या कार्यालयात हजर झाले. लाचलुचपत विभागाच्या पोलिसांनी त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता तिघांना न्यायालयाने 24 जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे.

अखेर 'त्या' तीन पोलिसांना अटक
अल्पवयीन मुलीवर अत्याचार; एकावर गुन्हा दाखल

एप्रिल महिन्यामध्ये वाळूची वाहतूक करणारे एक वाहन उपअधीक्षक मुंढे यांच्या पथकातील वसंत कान्हु फुलमाळी, संदीप वसंत चव्हाण व कैलास नारायण पवार (रा. पाथर्डी) यांच्या पथकाने पकडले होते. हे वाहन कारवाई न करता सोडून देण्यासाठी आणि पुढे हा व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी या कर्मचार्‍यांनी वाळू व्यावसायिकाकडे 15 हजार रूपयांची मागणी केली होती. याबाबत त्या व्यावसायिकाने नगरच्या लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली होती. लाच मागितली जात असल्याची पंचासमक्ष पडताळणी करण्यात आली. त्यातून तक्रारीत तथ्य आढळून आले. लाच मागणीचा पुरावा एसीबीच्या अधिकार्‍यांना मिळाला. त्यामुळे तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी पसार झाले होते. लाचलुचपत विभागाकडून त्यांचा शोध सुरू होता. दरम्यानच्या काळात आरोपींच्यावतीने जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. परंतु, न्यायालयाने तिघांचा जमीन अर्ज नामंजूर केला होता. शेवटी हे पोलीस कर्मचारी लाचलुचपत विभागाच्या कार्यालयात हजर झाले. लाचलुचपत विभागाच्या पोलिसांनी त्यांना अटक केेली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com