कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या आठ जनावरांची सुटका

कोतवाली पोलिसांनी झेंडीगेटमध्ये कारवाई
कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या आठ जनावरांची सुटका
file photo

अहमदनगर (प्रतिनिधी)

झेंडीगेटच्या कसाई गल्लीत कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या ६९ हजार रुपये किमतीच्या आठ गोवंशीय जनावरांची कोतवाली पोलिसांनी सुटका केली. सदरची जनावरे इसळक (ता. नगर) येथील सृष्टी गोपालन संस्थेत सोडण्यात आली आहेत.

file photo
Sagarika Ghatge Birthday: राजघराण्यातली मुलगी, अभिनेत्री म्हणून करिअर, शाहरुखसोबत ब्लॉकबस्टर हिट!

शुक्रवारी पहाटे पोलिसांनी ही कारवाई केली. याप्रकरणी एकाविरूध्द गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. जमील अब्दुल सय्यद (रा. घासगल्ली, नगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस अंमलदार दीपक रोहकले यांनी फिर्याद दिली आहे.

file photo
Irrfan Khan Birth Anniversary : आठवणीतला इरफान खान…

झेंडीगेटला कत्तलखाने सुरूच असून कोतवाली पोलिसांकडून तेथे कारवाई करण्यात येत आहे. आठ जनावरे कत्तलीसाठी आणून डांबून ठेवली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांना मिळाली होती. त्यांनी उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे यांच्या पथकातील पोलीस अंमलदार योगेश भिंगारदिवे, गणेश धोत्रे, योगेश कवाष्टे, नितीन शिंदे, सलिम शेख, संतोष गोमसाळे, अभय कदम, रोहकले, अमोल गाढे, सोमनाथ राऊत, अतुल काजळे, गणेश ढोबळे, कविता पुरी यांना कारवाई करण्याचे आदेश दिले.

file photo
“घाई घाईने RIP लिहिण्याच्या या जगात...”; पडद्यावर 'सिंधुताई' साकारणाऱ्या तेजस्विनीची पोस्ट चर्चेत

पथकाने पहाटे झेंडीगेटच्या कसाई गल्लीतील एका वाड्याजवळ छापा टाकून आठ गोवंशीय जनावरांची सुटका केली. पोलीस उपअधीक्षक अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलिसांनी सदरची कामगिरी केली.

file photo
बॉलिवूड सेलिब्रिटी करोनाच्या विळख्यात!

Related Stories

No stories found.