तीन गावठी कट्टे, नऊ काडतुससह परप्रांतिय जेरबंद

तारकपूर बसस्थानकात LCB ची कारवाई
तीन गावठी कट्टे, नऊ काडतुससह परप्रांतिय जेरबंद

अहमदनगर (प्रतिनिधी)

शहरातील तारकपूर बस बसस्थानकात विक्री करण्याचे उद्देशाने तीन गावठी कट्टे व नऊ जीवंत काडतुसे (किंमत 94 हजार 600 रूपये) अवैधरित्या जवळ बाळगणारा मुकेश रेवसिंग खोटे ऊर्फ बरेला (वय 31, रा. खुरमाबाद, ता. सेंदवा, जि. बडवाणी, राज्य मध्यप्रदेश) याला अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी गुप्तबातमीदाराकडून माहिती मिळाली की, तारकपूर बस स्थानकात वाहनतळा जवळ एक व्यक्ती गावठी कट्टे व जीवंत काडतुसे विक्री करण्यासाठी येणार आहे.

तीन गावठी कट्टे, नऊ काडतुससह परप्रांतिय जेरबंद
MBBS ची विद्यार्थिनी सदिच्छा साने बेपत्ता प्रकरणाचं गूढ उकललं! जीवरक्षकानंच घेतला जीव

त्यांनी पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, अंमलदार राजेंद्र वाघ, संजय खंडागळे, देवेंद्र शेलार, सुरेश माळी, संदीप घोडके, शंकर चौधरी, विशाल दळवी, रवी सोनटक्के, सागर ससाणे, मच्छिंद्र बर्डे, रवींद्र घुंगासे, मयुर गायकवाड, चंद्रकांत कुसळकर यांना वेशांतर करून सापळा लावण्यास सांगितले.

संशयीत व्यक्तीबद्दल पथकाची खात्री होताच पथकातील अधिकारी व अंमलदारांनी संशयीताचा पाठलाग करून त्यास शिताफीने ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता एक काळे रंगाचे सॅकमध्ये तीन गावठी बनावटीचे कट्टे व नऊ जीवंत काडतूसे मिळून आल्याने पंचासमक्ष जप्त करण्यात आला आहे.

तीन गावठी कट्टे, नऊ काडतुससह परप्रांतिय जेरबंद
माजी आरोग्यमंत्र्यांच्या गाडीला भीषण अपघात; रुग्णालयात दाखल

मुकेश बरेला याला अटक करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून भारतीय शस्त्र कायद्या प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मध्यप्रदेशमधूनच आले कट्टे

मुकेश रेवसिंग खोटे ऊर्फ बरेला याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याच्याकडे चौकशी केली. त्याने सदरचे गावठी कट्टे व जीवंत काडतुसे हे मध्यप्रदेश येथून विक्रीकरिता नगरमध्ये आणल्याची कबूली दिली आहे. मध्यप्रदेश राज्यातून वारंवार कट्टे विक्रीसाठी नगरमध्ये येत असल्याचे दिसून येत आहे.

तीन गावठी कट्टे, नऊ काडतुससह परप्रांतिय जेरबंद
अचानक ट्रॅक्टरसमोर येऊन उभा राहिला बिबट्या अन्..., पुढं जे घडलं ते थक्क करणारं
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com