
अहमदनगर (प्रतिनिधी)
कपडे धूत असलेल्या विवाहितेसमोर विचित्र हावभाव करून लज्जा उत्पन्न करण्याची घटना हिंगणगाव (ता. नगर) परिसरात गुरूवारी सकाळी घडली.
याप्रकरणी पीडित विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय अशोक वैराळ (रा. हमीदपूर, हिंगणगाव, ता. नगर) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयीताचे नाव आहे.
विवाहित महिला हिंगणगाव परिसरातील एका ओढ्यावर गुरूवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास कपडे धूत होती. त्यावेळेस अक्षय अशोक वैराळ हा तेथे आला. त्याने महिलेकडे पाहून विचित्र हावभाव केले. त्यामुळे महिलेला लज्जा उत्पन्न झाली.
त्यानंतर पीडित महिलेने गुरूवारी रात्री उशिरा दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक साबीर शेख पुढील तपास करीत आहेत.