नगर : नागापुरात घरफोडी

नगर : नागापुरात घरफोडी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नागापूर येथील बंगल्याचा दरवाजा तोडून चोरट्यांनी पाच तोळे सोने लंपास केले. आज मंगळवारी पहाटेच्यावेळी ही घटना घडली.

सुनील कल्हापुरे यांच्या घरी ही चोरी झाली. चोरट्यांच्या मारहाणीत कल्हापुरे हे जखमी झाले आहेत. कल्हापुरे कुटुंब घरात झोपले असताना पहाटेच्या सुमारास पाठीमागील दरवाजाची कडीकोयंडा कटावणीने तोडून चोरटे घरात शिरले. कल्हापुरे यांनी जाग आल्याने त्यांनी प्रतिकार केला. त्याचा राग आल्याने चोरट्यांनी त्यांच्या डोक्यात टॉमी मारली. त्यात ते जखमी झाले. चोरट्यांनी घरातील रोकड आणि पाच तोळे सोने लंपास केले.

घटनेची माहिती पोलिसांना कळविली. त्यानंतर एमआयडीसी व एलसीबी पोलीस तेथे पोहचले. कल्हापुरे हे उपचारासाठी दवाखान्यात असल्याने पोलिसात गुन्हा दाखल झालेला नव्हता.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com