गळा आवळून युवकाचा खून

दोघे पोलिसांच्या ताब्यात
गळा आवळून युवकाचा खून

अहमदनगर (प्रतिनिधी)

दोघा जणांनी एका युवकाचा दोरीने गळा आवळून खून केला. चास (ता. नगर) शिवारात ही घटना घडली.

राहुल कनका मोरे (वय 19 रा. बाबुर्डी घुमट ता. नगर) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी हनुमंत नरसू गायकवाड (वय- 24) व सुरज लक्षमन मोरे (वय 22 दोघे रा. बाबुर्डी घुमट) यांना नगर तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, पोलीस उपअधीक्षक अजित पाटील, नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली.

राहुलने सूरजच्या पत्नीबद्दल अपशब्द वापरल्याच्या कारणवरून त्याचा दोरीने गळा आवळून खून केला असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात भादंवि कलम 302, 120 (ब), 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com