माहेरी आलेल्या विवाहितेशी गैरवर्तन, मारहाण

सात जणांविरूध्द भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा
माहेरी आलेल्या विवाहितेशी गैरवर्तन, मारहाण

अहमदनगर (प्रतिनिधी)

विवाहिता माहेरी असताना तिचा विनयभंग करून मारहाण करण्यात आल्याची घटना नगर तालुक्यातील एका गावात घडली आहे. पीडित विवाहितेने भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सात जणांविरूध्द विनयभंग, मारहाण आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवनाथ वसंत चव्हाण, जया नवनाथ चव्हाण (दोघे रा. पिंपळगाव उज्जैनी ता. नगर), ढुमणे (पूर्ण नाव माहिती नाही, रा. गुजरात), छाया राजु लांडे (रा. दौलावडगाव ता. आष्टी, जि. बीड), वैशाली श्रीकांत कोतकर, श्रीकांत पोपट कोतकर (दोघे रा. शिवाजीनगर, केडगाव), सतिष मारूती कोहक (रा. दौलावडगाव ता. आष्टी, जि. बीड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. 8 नोव्हेंबर रोजी सकाळी ही घटना घडली असून 10 नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी यांचे सासर आष्टी (जि. बीड) तालुक्यातील असून माहेर नगर तालुक्यातील आहे. त्या माहेरी असताना नवनाथ व त्याची पत्नी जया फिर्यादीकडे आले. नवनाथने फिर्यादीसोबत लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. ढुमणे याने फिर्यादीला फोन करून त्यांच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, बोलणे केेले. तसेच छाया, वैशाली, श्रीकांत, सतिष यांनी फिर्यादीला शिवीगाळ, दमदाटी करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस नाईक जी.एस.साठे करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com