सुरेगावाच्या शंभू चव्हाण टोळीला मोक्का

सुरेगावाच्या शंभू चव्हाण टोळीला मोक्का

अहमदनगर (प्रतिनिधी)

स्वस्तात सोने देण्याच्या आमिषाने फसविण्यासाठी कुख्यात असलेल्या सुरेगाव (ता. श्रीगोंदे) येथील शंभू चव्हाण याच्या टोळीवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा (मोक्का) अन्वये कारवाई करण्यात आली आहे. शंभू चव्हाणसह सात जणांचा या टोळीमध्ये समावेश आहे.

सुरेगावाच्या शंभू चव्हाण टोळीला मोक्का
Katrina and Vicky : विकी-कतरिनाच्या हळदीचे फोटो पाहिलेत का?

श्रीगोंदे तालुक्याच्या उत्तरेला असलेल्या चिखली घाट परिसरात स्वस्तात सोने देण्याच्या आमिषाने बोलवून लुटण्याच्या घटना घडल्या होत्या. या टोळीचा सूत्रधार शंभ्या उर्फ शंभू कुंज्या चव्हाण (वय २८, रा. सुरेगाव) हा असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. शंभू चव्हाण याच्या टोळीने स्वस्तात सोन्याच्या आमिषाने दोन दरोडे, चोऱ्या, घरफोड्या, रस्ता लूट केल्याचे दहा गुन्हे उघडकीस आले आहेत.

सुरेगावाच्या शंभू चव्हाण टोळीला मोक्का
भाग्यश्रीच्या मनमोहक अदांची चाहत्यांना पडली भुरळ, पाहा फोटो

बेलवंडी पोलिसांनी ता. २७ ऑगस्ट २०२१ रोजीच्या दरोड्याच्या गुन्ह्यात मोक्का कायद्यान्वये कारवाईचा प्रस्ताव तयार केला होता. पोलिस अधीक्षकांनी हा प्रस्ताव मंजुरीसाठी नाशिक परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक बी. जी. शेखर यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविला होता. त्यांनी हा प्रस्ताव मंजूर केला आहे.

सुरेगावाच्या शंभू चव्हाण टोळीला मोक्का
विशाल निकम ठरला Bigg Boss Marathi 3 चा विजेता, जाणून त्याच्याविषयी...

राजू जावेद चव्हाण (वय २५), घड्याळ्या हिरामण चव्हाण (वय ५०), रेबिन घड्याळ्या चव्हाण (वय ४५), ओंकार कुंज्या चव्हाण (वय १९, सर्व रा. सुरेगाव, ता. श्रीगोंदे), बाबूश्या चिंगळ्या काळे (वय २०, रा. वांगदरी, ता. श्रीगोंदे), जितेंद्र रॉकेट चव्हाण (वय २५, रा. पढेगाव, ता. श्रीरामपूर) यांचा यामध्ये समावेश आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com