
अहमदनगर (प्रतिनिधी)
गोवंशीय जनावरांच्या मांसाची विक्री करणार्यांवर कारवाईचा धडाका कोतवाली पोलिसांनी सुरू केला आहे. कोतवाली ठाण्याच्या हद्दीत झेंडीगेट परिसरातील कारी मशिदीजवळ, हमालवाडा, कसाईगल्ली या ठिकाणी गोवंशीय जनावरांच्या मांसाची विक्री करणार्या तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे शोध पथकाने छापेमारी करून गोवंशीय जनावरांचे मांस विक्री करणार्यांवर कारवाई केली आहे. आवेज फारूख कुरेशी (वय 21 रा. ब्यापारी मोहल्ला, झेंडीगेट) जमील अब्दुल सय्यद (वय 28 रा.कोठला घासगल्ली), रिजवान अय्युब कुरेशी (वय 23 रा. बेपारी मोहल्ला, झेंडीगेट) या तिघांवर कोतवाली पोलीस ठाण्यात भादंवि कलम 269, महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारणा) अधिनियम 1995 चे कलम 5(अ), (क), 9 (अ) प्रमाणे तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईत सुमारे 180 किलो वजनाचे गोमांस, पाच सत्तुर व पाच वजनकाटे असा एकुन 36 हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
निरीक्षक यादव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मनोज कचरे, पोलीस अंमलदार तनवीर शेख, गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे, रियाज इनामदार, सलीम शेख, योगेश खामकर, अभय कदम, अमोल गाढे, संदीप थोरात, सुजय हिवाळे, कैलास शिरसाठ, सोमनाथ राऊत, सागर मिसाळ, अतुल काजळे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.