दुचाकीवरून जाणार्‍या महिलेचे गंठण ओरबडले

सावेडी उपनगरातील घटना; तोफखाना पोलिसांत गुन्हा
दुचाकीवरून जाणार्‍या महिलेचे गंठण ओरबडले

अहमदनगर (प्रतिनिधी)

दुचाकीवरून जाणार्‍या महिलेचे दीड तोळ्याचे सोन्याचे मिनी गंठण चोरट्यांनी ओरबडले. सावेडीतील गुलमोहर रस्त्यावर परिजात चौकात गुरूवारी सायंकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात दुचाकीवरील दोन अज्ञात चोरट्यांविरूध्द जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिपाली सोहम आंधळे (रा. निर्मलनगर, सावेडी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी या नणंद सानिका संजय आंधळे यांच्यासमवेत दुचाकीवरून गुरूवारी सायंकाळी सव्वा सहा वाजता परिजात चौकातून जात होत्या. त्यावेळेस पल्सर दुचाकीवर पाठीमागून आलेल्या दोघांनी दिपाली यांच्या गळ्यातील दीड तोळ्याचे सोन्याचे मिनी गंठण बळजबरीने हिसकावून घेतले. दोघे ही वेगात कुष्ठधामच्या दिशेने निघून गेले.

दोघा चोरट्यांनी अंगात काळ्या रंगाचे जर्किन आणि काळे मास्क घातले होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक (नगर शहर) अनिल कातकाडे, पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी, पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळुंके आदींनी घटनास्थळी धाव घेतली. आंधळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com