गुटखा वाहतूक करणार्‍या पाच जणांना अटक

एलसीबीने कुठे केली कारवाई?
गुटखा वाहतूक करणार्‍या पाच जणांना अटक

अहमदनगर|Ahmedagar

दोन टेम्पोमधून गुटखा वाहतूक करणार्‍या पाच जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पोलिसांनी (Police) अटक केली. शेख नासिर अहमद चाँदमिया (वय 44 रा. गाडेकर गल्ली, भिंगार), शेख अय्याज नसीर (वय 39 रा. मोमीन गल्ली, भिंगार), आबेद नासिर शेख (वय 34 रा. नागरदेवळे ता. नगर), सय्यद आसीफ महेमूद (वय 42 रा. मोमीन गल्ली, भिंगार), सादीक खान इमाम पठाण (वय 48 रा. नाईकवाडपुरा गल्ली, नेवासा) असे अटक केलेल्या आरोपींचे नावे आहेत. (Ahmednagar Crime News)

गुटखा वाहतूक करणार्‍या पाच जणांना अटक
लग्नाचे अमिष दाखवून भावी डॉक्टर तरुणीवर अत्याचार; कॉन्स्टेबलविरुध्द गुन्हा

त्यांच्याकडून हिरा गुटखा, रॉयल 717 तंबाखू व दोन टेम्पो (एमएच 16 सीसी 4920), (एमएच 16 सीसी 3621) असा 15 लाख 62 हजार 300 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यांचा एक साथीदार शेख अब्दूल रऊफ (रा. मोमीन गल्ली, भिंगार) हा पसार झाला आहे. पोलीस शिपाई कमलेश पाथरूट यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. नगर-दौंड रोडवरील अरणगाव (ता. नगर) चौक येथे ही कारवाई करण्यात आली.

काही इसम दोन टेम्पोमधून नगर-दौंड रोडने नगर शहरात गुटखा विक्रीसाठी घेऊन येत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीवरून निरीक्षक कटके यांनी सहायक निरीक्षक गणेश इंगळे, सोमनाथ दिवटे, पोलीस कर्मचारी मन्सूर सय्यद, संदीप पवार, संदीप घोडके, दिनेश मोरे, शंकर चौधरी, लक्ष्मण खोकले, सचिन आडबल, रवी सोनटक्के, दीपक शिंदे, राहुल सोळुंके, कमलेश पाथरूट, योगेश सातपुते यांच्या पथकाला कारवाई बाबत सूचना केल्या. पथकाने अरणगाव चौक येथे सापळा लावला. मिळालेल्या माहितीनुसार टेम्पो येताच पोलिसांनी त्यांना अडविले. पंचासमक्ष दोन्ही टेम्पोची झडती घेतली असता त्यामध्ये हिरा गुटखा व रॉयल 717 तंबाखू मिळून आली.

गुटखा वाहतूक करणार्‍या पाच जणांना अटक
आता स्वस्तात करता येणार AC चा प्रवास

पोलिसांनी टेम्पोसह गुटखा जप्त केला आहे. टेम्पोसह गुटखा वाहतूक करणार्‍या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली. वरील गुटख्याबाबत त्यांच्याकडे चौकशी केली असता टेम्पो (एमएच 16 सीसी 4920) व माल शेख नूर अब्दूल रऊफ याच्या मालकीचा असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच टेम्पो (एमएच 16 सीसी 3621) हा शेख नूर अब्दूल रऊफ याच्याच मालकीचा असून त्यातील माल हा सादीक खान इमाम पठाण याच्या मालकीचा असल्याची कबूली त्यांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी पठाण याला नेवासा येथून ताब्यात घेत अटक केली. मात्र शेख नूर अब्दूल रऊफ हा पसार झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, नगर ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com