नगरमधील माजी सैनिकाचा भोसकून खून; मृतदेह फेकला लोणी हद्दीत

दोन संशयित ताब्यात
नगरमधील माजी सैनिकाचा भोसकून खून; मृतदेह फेकला लोणी हद्दीत

अहमदनगर (प्रतिनिधी)

राहाता तालुक्यातील लोणी ते तळेगाव रोडवर गोगलगाव शिवारात रविवारी दुपारी एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. त्याच्या अंगावर असलेल्या जखमांच्या खुणामुळे या व्यक्तीचा खून झाल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. त्यामुळे लोणी पोलिसांनी स्वतः फिर्यादी होऊन अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, सदरचा मृतदेह नगर शहरातून शनिवारी बेपत्ता झालेले माजी सैनिक विठ्ठल नारायण भोर (वय 46 रा. गणेश चौक, बोल्हेगाव फाटा) यांचा असल्याचे समोर आले आहे.

एका अनोखी व्यक्तीचा मृतदेह गोगलगाव शिवारातील गोरडे पेट्रोल पंपापुढे असलेल्या सोमनाथ भाऊसाहेब मगर यांचे शेतात आढळून आला. लोणी पोलिसांना घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन तपासणीसाठी पाठवण्यात आला. सदर व्यक्तीच्या अंगावर असलेल्या जखमा पाहता छातीवर हत्याराने भोकसून खून केल्याचे प्रथमदर्शनी समोर आले. त्यानुसार लोणी पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक निलेश मुक्ताजी धादवड यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्ती विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नगरमधील माजी सैनिकाचा भोसकून खून; मृतदेह फेकला लोणी हद्दीत
संभाजी भिडे पुन्हा बरळले! महात्मा फुले, साईबाबांवर खालच्या भाषेत टीका

दरम्यान, नगर शहरातून शनिवारी बेपत्ता झालेले माजी सैनिक विठ्ठल नारायण भोर यांचा हा मृतदेह आले आहे. ते हरवले असल्याची नोंद तोफखाना पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. त्यादृष्टीने पोलिसांकडून खातरजमा केली असता तो मृतदेह भोर यांचा असल्याचे समोर आले. याप्रकरणी एका वर्तमानपत्राचा संचालक मनोज मोतीयानी व एका यू-ट्यूब चॅनेलचा पत्रकार स्वामी गोसावी या दोघा संशयितांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे चौकशी करण्यात येत आहे. लोणी येथील रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून मयत भोर यांच्या नातेवाईकांचा पुरवणी जबाब नोंदवल्यानंतर याबाबत अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

निंबळक शिवारात ‘गेम’

एलसीबीने मोतीयानी व गोसावी यांना ताब्यात घेताच त्यानी गुन्हा केल्याची कबुली दिली. विठ्ठल भोर व मनोज मोतीयानी यांचा प्रॉपर्टी खरेदी विक्रीचा व्यवहार असुन त्यावरून शनिवारी (29 जुलै) मोतीयानी याने त्याचा साथीदार गोसावी याला सोबत घेत भोर यांना कारमधून निंबळक (ता. नगर) शिवारात एक प्लॉट पाहण्यासाठी नेले. येथे मोतीयानी व भोर यांच्यात वाद झाल्याने मोतीयानी याने साथीदार गोसावी याच्या मदतीने भोर यांच्या छातीवर स्क्रु-ड्रायव्हरने वार करून खून केला. भोर मयत होताच मोतीयानी याने त्याची कार लोणीच्या दिशेने नेली. लोणी परिसरातील पेट्रोलपंपाजवळ भोर यांचा मृतदेह फेकून देत ते नाशिकच्या दिशेने पसार झाले.

मोतीयानी सराईत गुन्हेगार

मनोज वासुमल मोतीयानी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरूध्द तोफखाना व कोतवाली पोलीस ठाण्यात विनयभंग, अल्पवयीन मुलीस पळवून नेणे, खंडणीच्या उद्देशाने जिवे मारण्याची धमकी देणे, दुखापत करणे व जिवे मारण्याची धमकी देणे असे गंभीर स्वरूपाचे एकूण सहा गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com