धूम स्टाईलने दागिने, मोबाईल चोरला

नगर-मनमाड रोडवरील घटना; पोलिसांत गुन्हा
धूम स्टाईलने दागिने, मोबाईल चोरला

अहमदनगर (प्रतिनिधी)

दुचाकीवरून प्रवास करणार्‍या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने व दुसर्‍या दुचाकीवरील एका व्यक्तीचा मोबाईल असा 90 हजार रूपयांचा ऐवज दोन चोरट्यांनी धूम स्टाईलने लंपास केला. शनिवारी सकाळी अकरा ते साडेअकरा वाजेच्या दरम्यान नगर-मनमाड रोडवरील देहरे व विळद (ता. नगर) शिवारात या दोन्ही घटना घडल्या.

या प्रकरणी दोन अज्ञात चोरट्यांविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगल मच्छिंद्र दाभाडे (वय 45 रा. तांबे मळा, बुरूडगाव ता. नगर) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी व त्यांचे पती त्यांच्या दुचाकीवरून नगर-मनमाड रोडने नगरच्या दिशेने येत होते. ते देहरे शिवारील बंद पडलेल्या नर्सरीजवळ आले असता त्यांच्या पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी चालू दुचाकीत फिर्यादी यांच्या गळ्यातील 80 हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने बळजबरीने ओढून धूम ठोकली.

त्याच चोरट्यांनी दुचाकीवरून जाणार्‍या चेतन देविदास महल्ले (रा. बिडगाव ता. मुर्तीजापुर जि. अकोला) यांचा 10 हजार रूपये किंमतीचा मोबाईल दुपारी दोन ते अडीच वाजेच्या दरम्यान चोरला. ही घटना विळद (ता. नगर) बायपास रोडवर खिंडीजवळ घडली. या प्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक चाहेर करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com