२६ गुन्ह्यांत फरार सराईत गुन्हेगार जेरबंद

पोलिसांनी केला तीन किलोमीटर पाठलाग
२६ गुन्ह्यांत फरार सराईत गुन्हेगार जेरबंद

अहमदनगर (प्रतिनिधी)

अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यासह राज्यातील विविध शहरांत ४५ गंभीर गुन्हे (Serious crimes) दाखल असलेला व तिन मोक्का (MCOCA) गुन्ह्यासह २६ गंभीर गुन्ह्यात फरार असलेल्या सराईत आरोपी संदीप ईश्वर भोसले (Criminal Ishwar Bhosale) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे.

२६ गुन्ह्यांत फरार सराईत गुन्हेगार जेरबंद
बॉलिवूडमध्ये लग्नाचा सिझन.. रणबीर-आलिया लवकरच अडकणार लग्नबंधनात, तारीख ठरली?

गुन्हेगारी विश्वातील कुविख्यात अशी संदीप इश्वर भोसलेची ओळख आहे. त्याला रत्नागिरी येथे अटक करण्यात आली. पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी तीन दिवस सापळा लावला होता. शेतमजूर, कामवाले असा वेष परिधान करून स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी आणि कर्मचारी त्याच्या मागावर होते. जेव्हा तो पोलिसांच्या टप्प्यात आला तेव्हा पोलीस आपल्या मागावर असल्याचे समजताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला.

२६ गुन्ह्यांत फरार सराईत गुन्हेगार जेरबंद
Prarthana Behere : पांढऱ्या नक्षीदार साडीतला 'प्रार्थना'चा मोहक लूक, पहा फोटो

तीन किलोमीटर पाठलाग करत स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अखेर त्याला जेरबंद केले. अनेक वर्षांपासून तो फरार होता. काही दिवसांपूर्वी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तो निसटला होता.

जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सौरवकुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके, सपोनि सोमनाथ दिवटे, पोहेकॉ सुनिल चव्हाण, दत्ता हिंगडे, संदीवार, पोकॉ सागर ससाणे व रणजीत जाधव यांनी ही कामगिरी केली आहे. सदर गुन्हाचा स्थानिक गुन्हे शोखतील अधिकारी व अंमलदार हे समांतर तपास करीत असतांना गुन्हयातील आरोपी मिलन उर्फ मिलींद ईश्वर भोसले (वय २३, रा. बेलवंडी, ता. कर्जत हल्ली राहणार वनकूटे शिवार, ता.पारनेर) यास ताब्यात घेवून तपासादरम्यान त्याने लाखावर किंमतीचा मुद्देमाल काढून दिला. तसेच सदरचा गुन्हा त्याचे साथीदार संदीप ईश्वर भोसले, मटक ईश्वर भोसले, पल्या ईश्वर भोसले, अटल्या उर्फ अतूल ईश्वर भोसले आदींनी मिळून केल्याची कबुली दिली आहे.

२६ गुन्ह्यांत फरार सराईत गुन्हेगार जेरबंद
Amruta Khanvilkar : 'अप्सरा हो तुम, या कोई परी'! अमृताचं निळ्या साडीतील भुरळ घालणारं सौंदर्य

Related Stories

No stories found.