गोमांसाची वाहतूक करणारा पिकअप पकडला

एलसीबीची झेंडीगेटला कारवाई : सव्वा चार लाखांचा मुद्देमाल जप्त
गोमांसाची वाहतूक करणारा पिकअप पकडला

अहमदनगर (प्रतिनिधी)

गोवंशीय जनावरांची कत्तल करून ते पिकअपमध्ये भरून विक्री करण्यासाठी घेऊन जात असताना पोलिसांनी एकाला पकडले.

मोहसीन मुसा शेख (वय 32 रा. बारा इमाम, कोठला) असे पकडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याच्याकडून एक लाख 27 हजार 500 रूपये किंमतीचे 850 किलो गोमांस, तीन लाख रूपये किंमतीची पिकअप असा चार लाख 27 हजार 500 रूपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

सोमवारी सायंकाळी झेंडीगेट परिसरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली. शेख विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप घोडके यांनी फिर्याद दिली आहे. झेंडीगेट परिसरात मोहसीन शेख हा गोवंशीय जनावरांची कत्तल करून ते वाहनामध्ये भरून विक्री करण्यासाठी घेऊन जाणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती.

पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे, पोलीस अंमलदार भाऊसाहेब काळे, संदीप पवार, लक्ष्मण खोकले, योगेश सातपुते, मेघराज कोल्हे, उमाकांत गावडे यांच्या पथकाने झेंडीगेट परिसरात छापा टाकला. तेथे मोहसीन शेख हा पिकअप वाहनासह मिळून आला.

पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये गोमांस मिळून आले. शेख विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात भादंवि 269, 34, महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com