'राजयोग'वर कुंटणखाना, २ मुली ताब्यात

कर्डिलेसह ५ अटकेत
'राजयोग'वर कुंटणखाना, २ मुली ताब्यात
Crime

अहमदनगर (प्रतिनिधी)

नगर (ahmednagar) तालुका पोलिसांनी (police) दौंड रोडवरील (daund road) खंडाळा (khandala) शिवारात हॉटेल राजयोगवर छापा टाकून कुंटणखाना उध्वस्त केला.

देहविक्रय करणाऱ्या दोन मुलींना ताब्यात घेण्यात आले असून हॉटेल मालक अक्षय कर्डिलेसह ५ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

मंगळवारी सायंकाळी पोलिसांनी ही कारवाई केली. हॉटेल राजयोग येथे कुंटणखाना सुरू असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. त्यावरून मंगळवारी सायंकाळी सहायक पोलीस निरिक्षक राजेंद्र सानप यांच्या नेतृत्वात नगर तालुका पोलिसांनी कारवाई केली.

हॉटेल मालक अक्षय अनिल कर्डिले, सौरभ अनिल कर्डीले यांच्यासह विकी मनोहरलाल शर्मा, गणेश मनोहर लाड, संदीप पंडीत जाधव यांच्याविरोधात स्त्रीया व मुलींचा अनैतिक व्यापारास प्रतिबंध कायदा सन १९५६ च्या कलम ३,४,५ प्रमाणे गुन्हा दाखल करत अटक केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com