
अहमदनगर (प्रतिनिधी)
शहरातील कोतवाली पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विवेक पवार यांना लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे.
तक्रारदार यांचा मावस भाऊ व त्यांच्यासोबत असलेले चार सह आरोपी यांच्यावर कोतवाली पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्यात अटक न करता अटकपूर्व जामीन मंजूर होण्यास मदत करण्यासाठी सहाय्यक पोलिस निरीक्षक विवेक पवार यांनी 25 हजार रुपयांची मागणी केली होती. त्यानुसार कोतवाली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक पवार यांना लाचलुचपत विभागाने ताब्यात घेतले आहे.
एकीकडे कोतवाली पोलिसांनी नगर शहरात वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कंबर कसलीये. मात्र दुसरीकडे थेट सहाय्य्क पोलिस निरीक्षकानेच लाच मागितल्याने नगर शहरांतचं नही तर संपूर्ण जिल्ह्यात एकाच खळबळ उडाली आहे.