पत्नीसोबत गैरवर्तन; जाब विचारणार्‍या पतीला मारहाण

दोघा भावांविरूध्द एमआयडीसी पोलिसांत गुन्हा
पत्नीसोबत गैरवर्तन; जाब विचारणार्‍या पतीला मारहाण

अहमदनगर (प्रतिनिधी)

पत्नीसोबत गैरवर्तन केल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या पतीला दोघा भावांनी मारहाण केल्याची घटना 25 ऑक्टोबर रोजी सकाळी एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत घडली. पीडित महिलेने याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून विनयभंग, मारहाण आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अविनाश भाऊसाहेब ससाणे व रवी भाऊसाहेब ससाणे (दोघे रा. वडगाव गुप्ता ता. नगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघा भावांची नावे आहेत. 25 ऑक्टोबर रोजी सकाळी फिर्यादी या किराणा दुकानात सामान आणण्यासाठी चालल्या होत्या. त्यावेळी अविनाश ससाणे त्यांच्या समोरून पायी चालत येत होता. फिर्यादी त्याला पाहून रस्त्याच्या खाली सरकल्या. तेव्हा अविनाश हा फिर्यादीच्या दिशेने आला व त्याने फिर्यादीसोबत लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले.

दरम्यान घडलेल्या प्रकाराबाबत फिर्यादी यांच्या पतीने अविनाश याला समजून सांगण्याचा प्रयत्न केला असता त्याने फिर्यादीच्या तोंडात मारली. तसेच अविनाशचा भाऊ रवी याने फिर्यादीच्या पतीला लाकडी काठीने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत शिवीगाळ केले. तुला जीवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस नाईक चव्हाण करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com