Crime News : घरकाम करणार्‍या महिलेशी गैरवर्तन

Crime News : घरकाम करणार्‍या महिलेशी गैरवर्तन

अहमदनगर (प्रतिनिधी)

घरकाम करणार्‍या महिलेसोबत गैरवर्तन केल्याचा प्रकार बालिकाश्रम रस्त्यावरील एका घरात 27 ऑगस्ट रोजी घडला आहे. याप्रकरणी पीडित महिलेने 11 सप्टेंबर रोजी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अजगर अकबर सय्यद (रा. बालिकाश्रम रस्ता) याच्याविरूध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी महिला अजगर सय्यद याच्या घरी सुमारे एक महिन्यापासून धुण-भांडी व घरातील इतर कामे करत होत्या. त्या सकाळी 11 ते दोनच्या दरम्यान कामासाठी जात होत्या. 27 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता त्या काम करण्यासाठी गेल्या असता तो त्यांच्या जवळ आला व त्याने अश्‍लिल भाषेत बोलणे करून लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. दरम्यान, फिर्यादी घाबरलेल्या असल्याने त्यांनी घडलेला प्रकार कोणाला सांगितला नाही व कामावर जाणे बंद केले. त्यानंतरही सय्यद त्यांचा पाठलाग करत होता. तुला माझ्याकडे यावेच लागेल, तु जर आली नाही तर तुला मी बदनाम करेल, अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com