अल्पवयीन मुलीला पळवणारा 24 तासात जेरबंद

एमआयडीसी पोलिसांची कामगिरी
अल्पवयीन मुलीला पळवणारा 24 तासात जेरबंद

अहमदनगर | प्रतिनिधी

एमआयडीसी परिसरातून पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीचा 24 तासात शोध घेण्यात एमआयडीसी पोलिसांना यश आले आहे. 27 सप्टेंबर रोजी एमआयडीसी परिसरातून अल्पवयीन मुलीला अज्ञात इसमाने फुस लावून पळवून नेले होते.

याप्रकरणी पीडितेच्या नातेवाईकांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. गुन्ह्याचा तपास करत असतांना सहायक पोलीस निरिक्षक राजेंद्र सानप यांना गोपनिय माहिती मिळाली की, अल्पवयीन मुलगी ही शेंडी बायपास रोड एमआयडीसी नगर येथे आहे.

अल्पवयीन मुलीला पळवणारा 24 तासात जेरबंद
Gautami Patil : गौतमी पाटीलवर नगरमध्ये गुन्हा दाखल; काय आहे कारण?

त्यानुसार सानप यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे एक पथक तयार करुन गोपनिय माहितीच्या आधारे अल्पवयीन मुलीचा शोध घेवून मुलीस तिचे आईवडील यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुढील कारवाई एमआयडीसी पोलीस स्टेशनचे हवालदार पोपट टिक्कल हे करत आहेत.

अल्पवयीन मुलीला पळवणारा 24 तासात जेरबंद
संगमनेरात गॅस कटरने ATM मशीन फोडले, १४ लाख रुपये लंपास
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com