उद्घाटन कार्यक्रमात अल्पवयीन मुलीला छेडले

उपनगरातील घटना; चौघांविरूध्द पोलिसांत गुन्हा
उद्घाटन कार्यक्रमात अल्पवयीन मुलीला छेडले

अहमदनगर (प्रतिनिधी)

दुकानाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात अल्पवयीन मुलीला छेडल्याबद्दल चौघांविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील उपनगरात गुरूवारी रात्री ही घटना घडली. पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे.

ऋषीकेश चव्हाण, नय्याउद्दीन शेख, सोहेल शेख, ऋत्वीक लद्दे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. उपनगरात गुरूवारी एका दुकानाचे उद्घाटन सोहळा रात्री आयोजित केला होता. त्यावेळेस दुकानदाराच्या एका नातेवाईकाची अल्पवयीन मुलगी या ठिकाणी आली होती. तिचे जेवण झाल्यावर ती साडेदहा वाजण्याच्या सुमारास हात धुण्यासाठी गेली. त्यावेळेस काही मुलांनी तिचा हात धरून लज्जा उत्पन्न होईल, असे गैरवर्तन केले.

मुलीने हा प्रकार नातेवाईकांना सांगितला. एका नातेवाईकाने पोलिसांना फोन केला. पोलीस येताच त्यांनी पळ काढला. त्या मुलींना कार्यक्रमाच्या ठिकाणी बोलविणार्‍या रवी यादव याला पकडून बरोबरच्या सहकार्याची नावे विचारली असता. त्याने ऋषिकेश चव्हाण, नय्याउद्दीन शेख, सोहेल शेख, ऋत्वीक लद्दे असल्याचे सांगितले. त्यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com