अल्पवयीन मुलीला छेडले; बापालाही केली धक्काबुक्की

चार युवकांविरूध्द गुन्हा
अल्पवयीन मुलीला छेडले; बापालाही केली धक्काबुक्की

अहमदनगर (प्रतिनिधी)

शाळेत जाणार्‍या अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून छेड काढल्याप्रकरणी येथील तोफखाना पोलीस ठाण्यात चौघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी फिर्याद दिली आहे. सावेडी उपनगरात बुधवार आणि गुरूवार सायंकाळी ही घटना घडली आहे.

आकाश मारूती गोरे (रा. भिंगारदिवे मळा, नगर), त्याच्यासोबतचा एक अनोळखी, प्रतिक गव्हाणे (रा. निर्मलनगर, सावेडी) व अभिनव गवळी (रा. छत्रपती चौक, निर्मलनगर, सावेडी) अशी गुन्हा दाखल झालेल्या युवकांची नावे आहेत.

फिर्यादीची अल्पवयीन मुलगी शाळेत जात-येत असताना आकाश गोरे व त्याचे मित्र तिचा पाठलाग करत होते. बुधवारी सायंकाळी ही घटना घडली होती. तसेच गुरूवारी सायंकाळीही त्यांनी पाठलाग केला.

त्यावेळी फिर्यादी तेथे आले. त्यांनी पाठलाग करणार्‍या आकाशला जाब विचारला असता आकाश व त्याच्या तीन मित्रांनी फिर्यादीला शिवीगाळ करून धक्काबुक्की केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास तोफखाना पोलीस करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com