घर खाली करण्यास सांगितल्याने आला राग; भाडेकरूने केले असे काही की…

कोतवाली पोलिसांत परस्परविरोधी गुन्हे
घर खाली करण्यास सांगितल्याने आला राग; भाडेकरूने केले असे काही की…

अहमदनगर (प्रतिनिधी)

घर खाली करण्यास सांगितल्याचा राग आल्याने भाडेकरूंनी घरमालकास लाकडी दांडक्याने मारहाण केली. शहरातील मार्केट यार्ड भागातील सारसनगरमध्ये गुरूवारी दुपारी ही घटना घडली. याप्रकरणी सेवानिवृत्त शिक्षक चंद्रकांत दत्तात्रय बेलसरे (वय 83 रा. भूषणनगर, केडगाव) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

घर खाली करण्यास सांगितल्याने आला राग; भाडेकरूने केले असे काही की…
सीरिअल किलर 'चार्ल्स शोभराज' अखेर तुरुंगाबाहेर... त्याची गुन्ह्यांची कुंडली वाचून तुम्ही हैराण व्हाल

बेलसरे कुटुंबासह केडगावला राहत आहेत. त्यांचे सारसनगर भागात घर आहे. त्यांनी सुनीता अरूण अबनावे यांना हे घर भाड्याने दिले होते. अबनावे यांना हे घर खाली करण्यास यापूर्वी सांगितले होते. तरीही त्यांनी घर खाली केले नाही. बेलसरे हे गुरूवारी दुपारी अबनावे यांना घर खाली करण्याचे सांगण्यासाठी गेले. त्यावेळेस सुनीता अबनावे, क्षीतिज अरूण अबनावे, लेखा क्षीतिज अबनावे यांनी लाकडी दांडक्याने मारहाण केली. बेलसरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुनीता, क्षीतिज, लेखा अबनावे यांच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

घर खाली करण्यास सांगितल्याने आला राग; भाडेकरूने केले असे काही की…
धुणे धुण्यासाठी गेलेल्या मायलेकींचा पाण्यात बुडून मृत्यू, हृदय पिळवटून घटना

लेखा अबनावे यांनीही कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीत म्हटले आहे की, गुरूवारी दुपारी सारसनगर येथील घरी असताना, घरासमोर चार दुचाक्या उभ्या केलेल्या होत्या. घराच्या बाहेर येऊन पाहिले असता, जितू ढापसे हा तीन अनोळखी महिलांसमवेत त्या ठिकाणी होता. त्याने घराच्या दरवाज्यातून आत आला. त्याच्यासमवेत असलेल्या तीन महिलांनी सासू सुनीता अबनावे यांना घरात घुसून मारहाण केली. या प्रकरणी जितू ढापसेसह तीन अनोळखी महिला अशा चौघांविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात घरात घुसून मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घर खाली करण्यास सांगितल्याने आला राग; भाडेकरूने केले असे काही की…
...म्हणून पत्नीचा केला खून; मृत विवाहितेच्या आईची तक्रार
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com