घराकडे पाहिल्याने माय-लेकाला दांडक्याने मारहाण

केडगाव उपनगरातील घटना; कोतवालीत गुन्हा
घराकडे पाहिल्याने माय-लेकाला दांडक्याने मारहाण

अहमदनगर (प्रतिनिधी)

घराकडे पाहिल्याचा राग मनात धरून माय-लेकाला लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची घटना गुरूवारी दुपारी केडगाव उपनगरात घडली. ज्योती अनिल चव्हाण (वय 30) व त्यांचा मुलगा शुभम अनिल चव्हाण (रा. वडारगल्ली, केडगाव) अशी जखमींची नावे आहेत.

या प्रकरणी ज्योती चव्हाण यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून प्रशांत सुनील चव्हाण विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरूवारी दुपारी ज्योती चव्हाण व शुभम त्यांच्या घराच्या समोर असताना तेथे प्रशांत चव्हाण हातात दांडके घेऊन आला व फिर्यादीला म्हणाला की,‘तुझा मुलगा शुभम घराकडे का पाहतो’, असे म्हणून शिवीगाळ करून लागला.

फिर्यादी यांनी त्याला शिव्या का देतो, असे विचारले असता त्याने लाकडी दांडक्याने फिर्यादीच्या डोक्यात व त्यांचा मुलगा शुभमच्या डोक्यातही मारहाण करून त्यांना जखमी केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास तोफखाना पोलीस करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com