चोरट्यास मारहाण; तिघांविरूध्द गुन्हा

चोरट्यास मारहाण; तिघांविरूध्द गुन्हा

अहमदनगर (प्रतिनिधी)

सोन्याची चेन चोरणारा चोरटा नागरिकांनी पकडून पोलिसांच्या हवाली केला. मात्र हा प्रकार तिघांच्या अंगलट आला आहे. चोरट्याला पकडल्यावर त्याला बेदम मारहाण केल्याने त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी तिघांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मनोज ननावरे, प्रकाश कांबळे व पवार (पूर्ण नावे माहिती नाही) यांच्याविरूद्ध हा गुन्हा दाखल झाला आहे. सोमनाथ रंगनाथ आडागळे (वय ३२, रा. भूषणनगर, केडगाव) याने फिर्याद दिली आहे. कायनेटीक चौकात असलेल्या रविश कॉलनीत बुधवारी सकाळी ही घटना घडली होती..

रविश कॉलनीमधील रहिवासी सुरेखा पेगडवार या घरात असताना घरात घुसलेल्या व्यक्तीने पेगडवार यांच्या गळ्यातील सोन्याची चेन ओढून घेत पळ काढला होता. काही नागरिकांनी पाठलाग करत त्याला पकडले व मारहाण केली होती.

कोतवाली पोलीस ठाण्यात पेगडवार यांच्या फिर्यादीवरून सोमनाथ आडागळे विरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, आडागळे यांनीही मारहाण केल्याची फिर्याद दिली असून, ननावरे, कांबळे व पवार यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला.

Related Stories

No stories found.