तीन दिवसांत 53 जणांना करोना

अहमदनगरची रूग्णसंख्या वाढतेय || जमावबंदीचा आदेश धाब्यावर
तीन दिवसांत 53 जणांना करोना

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

करोनाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेचा धोका (Danger of a Possible Third Wave of the Corona) अधिक गडद होत आहे. अहमदनगर शहरात रूग्णसंख्येत (Ahmednagar City Patient) वाढ होताना दिसत आहे. गेल्या तीन दिवसांत 53 रूग्णांना करोना (Positive Patient) संसर्गाचे निदान झाल्याचे समोर आले आहे. यामुळे नगरकरांनी अधिक खबरदारी घेण्याची आवश्यता आहे.

तीन दिवसांत 53 जणांना करोना
घोडेगावात कांदा आवक घटली

मागील काही दिवसांत अहमदनगर शहराची रूग्णसंख्या कमी झाली होती. त्यात 2 जानेवारीला 31, 3 जानेवारीला 14 आणि काल 4 जानेवारीला 8 करोना बाधीत समोर आले आहे. सध्या लग्नसमारंभ दणक्यात सुरू असून इतर कार्यक्रमांना मोठ्या प्रमाणात गर्दी पाहिला मिळत आहे. याशिवाय बाजारपेठा आणि रात्रीच्यावेळी चौका-चौकात गर्दी होताना दिसत आहे. रात्री नऊ नंतर जमावबंदी आदेश लागू असला तरी त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही.

तीन दिवसांत 53 जणांना करोना
स्मशानभूमीत अज्ञाताकडून काळ्याजादूचा प्रयोग

रात्री उशिरापर्यंत हॉटेलमध्ये गर्दी असते. यातून रूग्णसंख्या वाढण्यास वेळ लागणार नाही. महापालिका, पोलीस प्रशासनाने जमावबंदीचा आदेशाची कडक अंमलबजावणी करण्याची गरज निर्माण झाली आहे.

तीन दिवसांत 53 जणांना करोना
हॉटेलमध्ये काम करणारा तरुण आता 25 कोटींचा झाला मालक

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com