Covid 19 : नगर जिल्ह्यात आज 482 करोना रूग्ण घरी तर 'एवढ्या' बाधितांची वाढ

Covid 19 : नगर जिल्ह्यात आज 482 करोना रूग्ण घरी तर 'एवढ्या' बाधितांची वाढ

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यात आज 482 रुग्णांना (Covid 19 Patient) रुग्णालयातून डिस्चार्ज (Hospital Discharge) देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 2 लाख 74 हजार 844 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 96.97 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत 487 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या आता 2 हजार 634 इतकी झाली आहे. (Corona Positive Patient)

जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 21, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 158 आणि अँटीजेन चाचणीत 308 रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये (Corona Test Lab) बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 04, जामखेड 01, कोपरगाव 05, नगर ग्रा. 06, राहुरी 01, श्रीरामपूर 01, कँटोन्मेंट बोर्ड 01 आणि इतर जिल्हा 02 अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत (Private laboratory) केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 15, अकोले 03, जामखेड 06, कर्जत 02, कोपरगाव 02, नगर ग्रा. 06, नेवासा 06, पारनेर 27, पाथर्डी 03, राहता 06, राहुरी 12, संगमनेर 23, शेवगाव 16, श्रीगोंदा 18, श्रीरामपूर 12 आणि इतर जिल्हा 01 अशा रुग्णांचा समावेश आहे.

तर अँटीजेन चाचणीत (antigen testing) आज 308 जण बाधित आढळुन आले. मनपा 06, अकोले 09, जामखेड 37, कर्जत 18, कोपरगाव 11, नगर ग्रा. 13, नेवासा 11, पारनेर 49, पाथर्डी 47, राहाता 09, राहुरी 09, संगमनेर 44, शेवगाव 17, श्रीगोंदा 25 आणि श्रीरामपूर 03 अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा 15, अकोले 13, जामखेड 32, कर्जत 15, कोपरगाव 18, नगर ग्रा. 30, नेवासा 27, पारनेर 56, पाथर्डी 65, राहता 36, राहुरी 36, संगमनेर 30, शेवगाव 26, श्रीगोंदा 62, श्रीरामपूर 13, कँटोन्मेंट बोर्ड 03, मिलिटरी हॉस्पिटल 02 आणि इतर जिल्हा 03 अशा रुग्णांचा समावेश आहे.

* बरे झालेली रुग्ण संख्या : 2,74,844

* उपचार सुरू असलेले रूग्ण : 2634

* पोर्टलवरील मृत्यू नोंद : 5966

* एकूण रूग्ण संख्या : 2,83,444

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com