नगर जिल्ह्यात 93 रूग्णांना डिस्चार्ज तर 109 बाधितांची वाढ

नगर जिल्ह्यात 93 रूग्णांना डिस्चार्ज तर 109 बाधितांची वाढ

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यात आज 93 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 68 हजार 998 इतकी झाली आहे.

रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 97.25 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (गुरुवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत 109 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या आता 867 इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 49, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 47 आणि अँटीजेन चाचणीत 13 रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 10, अकोले 02, कर्जत 01, कोपरगाव 05, नेवासा 02, पारनेर 05, राहुरी 03, संगमनेर 15, श्रीगोंदा 05 आणि इतर जिल्हा 01 अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 10, अकोले 02, कोपरगाव 04, नगर ग्रामीण 13, नेवासा 01, पारनेर 01, पाथर्डी 01, राहाता 03, राहुरी 01, संगमनेर 07, शेवगाव 01, श्रीगोंदा 01, श्रीरामपूर 01 आणि इतर जिल्हा 01 अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज 13 जण बाधित आढळुन आले. यामध्ये मनपा 01, कर्जत 01, नगर ग्रामीण 01, पारनेर 02, राहाता 02, राहुरी 05 आणि कँटोन्मेंट बोर्ड 01 अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा 20, अकोले 03, कोपरगाव 09, नगर ग्रामीण 09, नेवासा 02, पारनेर 02, पाथर्डी 08, राहाता 10, राहुरी 02, संगमनेर 05, शेवगाव 02, श्रीगोंदा 07, श्रीरामपूर 09, मिलिटरी हॉस्पिटल 01 आणि इतर जिल्हा 04 अशा रुग्णांचा समावेश आहे.

* बरे झालेली रुग्ण संख्या : 68998

* उपचार सुरू असलेले रूग्ण : 867

* मृत्यू : 1076

* एकूण रूग्ण संख्या : 70641

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com