COVID19 : जिल्ह्यात आज एक हजाराहून अधिक रुग्णांची नोंद

कुठे, किती रुग्ण?
COVID19 : जिल्ह्यात आज एक हजाराहून अधिक रुग्णांची नोंद

अहमदनगर | Ahmednagar

जिल्ह्यात करोना संसर्गाचा वेग आटोक्यात येत असला तरी अद्याप त्यावर पूर्ण नियंत्रण येण्यास काही कालावधी लागणार असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात मंगळवारी पुन्हा संगमनेर, नेवासा आणि श्रीगोंदा तालुक्यात करोनाचे शतक झालेले असून यामुळे नव्याने 1 हजार 152 नवे रुग्ण वाढले आहेत. तर मृतांच्या आकडेवारीतही 54 ची भर पडलेली आहे.

जिल्ह्यात काल सकाळी 963 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे करोना मुक्त होणार्‍यांची संख्या 2 लाख 49 हजार 996 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे 94.95 टक्के इतके झाले आहे. तर उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या आता 10 हजार 19 इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 375, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 428 आणि अँटीजेन चाचणीत 349 रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 2, अकोले 48, जामखेड 42, कर्जत 6, नगर ग्रामीण 38, पारनेर 36, पाथर्डी 6, राहुरी 2, संगमनेर 110, शेवगाव 50, श्रीगोंदा 27, कँटोन्मेंट बोर्ड 4 आणि इतर जिल्हा 4 अशा रुग्णांचा समावेश आहे. खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 21, अकोले 6, जामखेड 4, कर्जत 4, कोपरगाव 5, नगर ग्रामीण 12, नेवासा 119, पारनेर 19, पाथर्डी 6, राहाता 41, राहुरी 35, संगमनेर 33, शेवगाव 14, श्रीगोंदा 30, श्रीरामपूर 43, कँटोन्मेंट बोर्ड 1 आणि इतर जिल्हा 4 अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत काल 349 जण बाधित आढळुन आले. मनपा 13, अकोले 28, जामखेड 15, कर्जत 28, कोपरगाव 15, नगर ग्रामीण 16, नेवासा 18, पारनेर 31, पाथर्डी 39, राहाता 32, राहुरी 17, संगमनेर 10, शेवगाव 25, श्रीगोंदा 30, श्रीरामपूर 28 आणि इतर जिल्हा 4 अशा रुग्णांचा समावेश आहे.

संगमनेर 153, नेवासा 137, श्रीगाेंंदा 118, शेवगाव 89, पारनेर 86, अकोले 82, राहाता 73, श्रीरामपूर 71, नगर ग्रामीण 66, जामखेड 61, राहुरी 54, पाथर्डी 51, कर्जत 38, नगर मनपा 36, कोपरगाव 20, अन्य जिल्हा 12, भिंगार 5, लष्कर रुग्णालय शुन्य असे आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com