Coronavirus : जिल्ह्यात आज दोन हजार ६३७ रुग्णांची नोंद
करोना अपडेट

Coronavirus : जिल्ह्यात आज दोन हजार ६३७ रुग्णांची नोंद

श्रीगोंद्यासह 'या' तालुक्यांमध्ये सर्वाधिक रुग्ण

अहमदनगर | Ahmednagar

जिल्ह्यात गुरूवारी नव्याने 2 हजार 637 नवे करोना बाधित रुग्ण सापडले असून करोनातून मुक्त होणार्‍यांची संख्या याहून दुप्पट आहे. यामुळे उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या आता 19 हजारांच्या खाली आली आहे. दरम्यान, आता श्रीगोंंदा तालुका बाधितांच्या आकडेवारीत टॉपवर पोहचला आहे. तर मृतांच्या संख्येत 32 ने वाढ झाली आहे.

जिल्ह्यात काल 4 हजार 107 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे करोनामुक्तांची संख्या 2 लाख 21 हजार 137 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 91.37 टक्के इतके झाले तर उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या आता 18 हजार 605 इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 221, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 1 हजार 88 आणि अँटीजेन चाचणीत 1 हजार 328 रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 22, अकोले 3, जामखेड 2, कर्जत 60, कोपरगाव 21, नगर ग्रामीण 60, पारनेर 2, पाथर्डी 1, राहाता 3, राहुरी 19, शेवगाव 1, श्रीरामपूर 3, कँटोन्मेंट 13 आणि इतर जिल्हा 11 अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 120, अकोले 23, जामखेड 81, कर्जत 10, कोपरगाव 22, नगर ग्रामीण 71, नेवासा 71, पारनेर 93, पाथर्डी 74, राहाता 67, राहुरी 36, संगमनेर 99, शेवगाव 155, श्रीगोंदा 19, श्रीरामपूर 117, कँटोन्मेंट बोर्ड 8 आणि इतर जिल्हा 21 आणि इतर राज्य 1 अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत 1 हजार 328 जण बाधित आढळुन आले. मनपा 21, अकोले 58, जामखेड 47, कर्जत 48, कोपरगाव 69, नगर ग्रा. 53, नेवासा 80, पारनेर 136, पाथर्डी 101, राहाता 65, राहुरी 67, संगमनेर 173, शेवगाव 60, श्रीगोंदा 274, श्रीरामपूर 65 आणि इतर जिल्हा 11 अशा रुग्णांचा समावेश आहे. बुधवारी करोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 2 हजार 543 होती. त्यात गुरूवारी 32 ने वाढ झाली असून यामुळे करोना बळींची संख्या ही 2 हजार 575 झाली आहे.

तालुकानिहाय बाधित

श्रीगोंदा 293, संगमनेर 272, पारनेर 231, शेवगाव 216, श्रीरामपूर 185, नगर ग्रामीण 184, पाथर्डी 176, मनपा 163, नेवासा 151, राहाता 135, जामखेड 130, राहुरी 122, कर्जत 118, कोपरगाव 112, अकोले 84, अन्य जिल्हा 43, भिंगार 21, अन्य राज्य 1 असे आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com